12 वर्षाच्या मुलाने कमावले तब्बल 2 कोटी रुपये; कसे ते वाचा

लंडनमध्ये 12 वर्षाच्या एका मुलाने असे करून दाखवले आहे, की त्यावर सहजासहजी विश्वास ठेवणं सोप नाही.

Updated: Aug 30, 2021, 11:35 AM IST
12 वर्षाच्या मुलाने कमावले तब्बल 2 कोटी रुपये; कसे ते वाचा title=

लंडन : लंडनमध्ये 12 वर्षाच्या एका मुलाने असे करून दाखवले आहे, की त्यावर सहजासहजी विश्वास ठेवणं सोप नाही.शाळेच्या सुट्यांमध्ये 12 वर्षाच्या बेन्यामिन अहमदने 'वीअर व्हेल्स' नावाच्या पिक्सलेटेड आर्टवर्क बनवले. ज्याला विकून त्याने 2 कोटींची कमाई केली. बेन्यामिनने या डिजिटल फोटोला एनएफटी (नॉन फंजिबल टोकन्स)ला विकले होते. त्याच्या निर्मितीला तब्बल 2 कोटी 93 लाख रुपये मिळाले.

एनएफटीच्या माध्यमातून कोणत्याही निर्मितीला टोकन दिले जाऊ शकते. यातून एक डिजिटल सर्टिफिकेट बनते. आणि पुन्हा कलाकृतीची खरेदी किंवा विक्री केली जाते. बेन्यामिनसोबत शिकणाऱ्या मित्रांना माहितही नव्हते की आपल्या मित्राने घरबसल्या 2 कोटी कमावले आहे. बेन्यामिनला स्विमिंग, बॅडमिंटन खेळणे आणि ताइक्वांडो प्रॅक्टिस करायला आवडतं. 

बेन्यामिन म्हणतो की, 'ज्या मित्रांना या फिल्डमध्ये यायचे असेल त्यांना माझा सल्ला असेल की, कोणत्याही दबावात येऊन आणि जबरदस्ती स्वतःला कोडिंग करण्यासाठी बाध्य करू नका.' बेन्यामिनचे वडिल इमरान एक सॉफ्टवेअर डेवलपर आहेत. त्यांनी बेन्यामिन आणि त्याचा भाऊ युसूफला पाच - सहा वर्षाच्या वयातच कोडिंग सुरू करण्याला प्रोत्साहित केले. 

इमरानने म्हटले की, 'मुलांना तांत्रिक मदतीसाठी तज्ज्ञांचा सल्ला आणि मदत मिळाली. परंत तरी ते ही निर्मिती करू शकले ही अभिमानास्पद बाब आहे.'इमरान म्हणतात की, 'हा अभ्यास गंमती-जमतीत सुरू झाला होता. परंतु मला लवकरच अंदाज आला की,  मुलांना कोडिंगमध्ये आवड आहे आणि ते चांगली निर्मिती करू शकतील. त्यानंतर आम्ही थोडे गंभीर झालो. त्यानंतर आज मुलांनी जे यश मिळवलं हे सगळ्यांसमोर आहे.'

त्यांनी म्हटले की, त्यांचे दोन्ही मुले दर दिवसाला 20 ते 30 मिनिटे कोडिंग प्रॅक्टिस करतात. अगदी सुटीच्या दिवशीदेखील त्यांची प्रॅक्टिस सुरू असते.वीअर्ड व्हेल, बेन्यामिनचा दुसरा डिजिटल कला संग्रह आहे. याआधी त्यांनी Minecraftपासून प्रेरणा घेऊन निर्मिती तयार केली आहे. परंतु ती विशेष किंमतीला विकली गेली नव्हती. 

बेन्यामिनने आतापासून आपल्या तिसऱ्या सुपरहिरो थिमच्या संग्रहावर काम करणे सुरू केले आहे. इमरान पूर्णतः आश्वस्त आहेत की,  त्यांच्या मुलाने कोणतेही कॉपीराईट कायदे तोडलेले नाहीत. ते या कामासाठी ऑडिट आणि डिजाईनला ट्रेडमार्क करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेत आहेत.