बायडेन बनले अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष, कमला हॅरिस ठरल्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष

जो बिडेन यांनी बुधवारी अमेरिकेच्या 46 व्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली.

Updated: Jan 20, 2021, 10:40 PM IST
बायडेन बनले अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष, कमला हॅरिस ठरल्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष title=

वॉशिंग्टन : जो बिडेन यांनी बुधवारी अमेरिकेच्या 46 व्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. देशातील सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी त्यांना शपथ दिली. बायडेन यांनी बायबलवर हात ठेवून शपथ घेतील. 78 वर्षीय बिडेन सर्वात जुने अध्यक्ष होणारे पहिले व्यक्ती आहेत. बिडेन यांच्याआधी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश सोनिया सोटोमायोर यांनी त्यांना शपथ दिली.

या शपथविधी सोहळ्याला माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश, बराक ओबामा, बिल क्लिंटन, रिपब्लिकन नेते मॅककार्थी आणि मॅक्कॉनेल हे शपथविधी सोहळ्यास उपस्थित होते. 

कमला हॅरिस यांची शपथविधी ऐतिहासिक ठरली आहे. दक्षिण आशियाच्या आणि महिला उपाध्यक्ष म्हणून शपथ घेणाऱ्या त्या पहिला महिला आहेत. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेण्यापूर्वी व्हाईट हाऊस सोडलं. त्यांच्या अनुपस्थितीत, माजी उपाध्यक्ष माईक पेंस यांनी सर्व परंपरा पार पाडल्या.