काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. काबुल इथल्या गुरूद्वारात दहशतवाद्यांनी स्फोट आणि गोळीबार केला.
दहशतवादी हल्ल्यात अनेकजण जखमी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अनेक भाविक गुरूद्वारात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
तालिबानची सत्ता आल्यापासून संपूर्ण अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. अफगाणिस्तानचे लोक पुन्हा एकदा वाईट परिस्थितीतून जात आहेत. देश आर्थिक, सुरक्षा आणि राजकीय संकटाचा सामना करत आहे असं अफगाणिस्तानमध्ये असलेले भारताचे राजदूत म्हणाले.
Explosions heard in Karte Parwan area of Kabul city. Details about the nature and casualties of this incident are not yet known: Afghanistan's TOLOnews
— ANI (@ANI) June 18, 2022
#WATCH | Explosions heard in Karte Parwan area of Kabul city in Afghanistan.
(Video Source: Locals) pic.twitter.com/jsiv2wVGe8
— ANI (@ANI) June 18, 2022