Billionaire Daughter: 11 वर्षांच्या एका मुलीचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात श्रीमंतीचा थाटमाट दाखवण्यात आला आहे. पण व्हायरल झालेल्या या व्हिडिओवरुन सोशल मीडियावर मात्र वेगळेच युद्ध छेडले आहे. टिकटॉकवर 'अरबपती की बेटी' या नावाने लोकप्रिय असलेल्या मू अब्राहम या चिमुरडीने तिच्या व्हिडिओत 100,000 डॉलर (जवळपास 1 कोटी)चे घड्याळ आणि 40,000 डॉलर (26 लाखांची) पर्स दाखवत फोटोशूट केले आहे.
मू अब्राहम हिचे आई-वडिल एमिली आणि एडम अब्राहिम यांनी लव्ह लक्झरी नावाने सेकेंड हँड लक्झरी सामानांचे एक दुकान सुरू केले आहेत. या दुकानात हँडबॅग, घड्याळ आणि ज्वेलरी रीसेल केली जाते. पण मू अब्राहम ही इतर लहान मुलींसारखं खेळण्यांसोबत खेळण्याऐवजी डायर, गुच्ची, हर्मीस, लुई वुइटनसारखे ब्रँडेड वस्तू परिधान करताना दिसते. मूचे सोशल मीडियावर 200 मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर आहेत.
रिपोर्टच्यानुसार, या मुलीने व्हिडिओत दावा केला आहे की, तिच्या मनगटावर पाटेक फिलिप नॉटिलस 5711 हे घड्याळ असून याची किंमत 100,000 पाउंड आहे. बिझनेस इनसाइडरने दिलेल्या वृत्तानुसार, मुलीने व्हिडिओत दाखवलेल्या वस्तू या दुकानातील स्टॉकचाच एक भाग आहेत. या तिने खरेदी केलेल्या वस्तू नाहीयेत. जेव्हा पण मू अशी एखादी पोस्ट शेअर करते तेव्हा लाखो लोकांचे लक्ष तिच्याकडे आकर्षित होते.
मूच्या पोस्टवर अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजर्सने लिहलेले आहे की, इथे देश आणि जगातील लोक भूखमारीने आणि अन्य समस्याममुळं ग्रस्त आहेत. तेव्हा असं श्रीमंतीचे प्रदर्शन मांडणे खूपच चुकीचे आहे. मूची आई ऐमिली अब्राहम हिने बिझनेस इनसाइडरला दिलेल्या माहितीनुसार, मूमुळं त्यांच्या कंपनीला सोशल मीडियावर फॉलोवर्स वाढवण्यासाठी मदत होते.