पंतप्रधान मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. 

Updated: Nov 14, 2019, 08:04 AM IST
पंतप्रधान मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट

ब्रासीलिया : ब्राझीलमध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स संमेलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये या दरम्यान द्विपक्षीय चर्चा झाली. ब्राझीलची राजधानी ब्रासिलियामध्ये ही भेट झाली. ११ व्या ब्रिक्स संमेलनात सहभाग घेण्यासाठी पंतप्रधान मोदी ब्रासिलियामध्ये पोहोचले आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, ब्राझीलचे  राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. 

'भविष्यातील आर्थिक वृद्धी' या संकल्पनेवर ११ वे ब्रिक्स संमेलन होत आहे. भारतातील व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींची टीम देखील ब्रिक्स व्यापार फोरममध्ये सहभागी होत आहे.

आज १४ नोव्हेंबरला सर्व नेते एका सत्रात सहभागी होणार आहेत. बंद दरवाजात हे सत्र होणार आहे. यावेळी देशातील आर्थिक विकासासाठी ब्रिक्सचे सहकार्य यावर चर्चा होत आहे. या दरम्यान व्यापार आणि गुंतवणुक संदर्भातील करारावर सह्या होणार आहेत.