Starbucks कंपनीच्या नव्या CEOची सॅलरी स्लिप व्हायरल, आकडे मोजून दम लागेल

Starbucks CEO Salary : स्टारबक्स कंपनीच्या सीईओपदी ब्रायन निकोल यांची नियुक्ती करण्यात आली असून यानंतर स्टारबक्सच्या शेअरमध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ब्रायन निकोल यांना देण्यात येणाऱ्या पगाराची स्लिप व्हायरल झाली आहे.   

राजीव कासले | Updated: Aug 15, 2024, 04:26 PM IST
Starbucks कंपनीच्या नव्या CEOची सॅलरी स्लिप व्हायरल, आकडे मोजून दम लागेल title=

Starbucks CEO Salary: आंतरराष्ट्रीय कॉफी चेन असलेल्या स्टारबक्स कंपनीने (Starbucks) नव्या सीईओची नियुक्ती केली आहे. ब्रायन निकोल (Brian Niccol) यांच्याकडे कंपनीची जबाबदारी सोपवण्यात आलीआहे निकोल हे लक्ष्मण नरसिम्हन यांची जागा घेतील. काही दिवसांपूर्वीच स्टारबक्स कंपनीने नरसिम्हन यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. स्टारबक्सची कमान सांभाळणाऱ्या सीईओ निकोल यांच्या सॅलरीची स्लिप व्हायरल झाली आहे. यानुसार स्टारबक्स कंपनीकडून नवे सीईओ निकोल यांना जवळपास 113 मिलियन डॉलर म्हणजे भारतीय रुपयात 9,48,61,57,900 इतका पगार दिला जाणार आहे. 

सॅलरी पॅकेजमध्ये कोणत्या सुविधा?
113 मिलिअन डॉलर सॅलरी पॅकेजमध्ये $10 दशलक्ष साइन-ऑन बोनस, $75 दशलक्ष इक्विटी अनुदान आणि $23 दशलक्ष वार्षिक अनुदान समाविष्ट आहे. याशिवाय, दरवर्षी 1.6 दशलक्ष  पगार आणि 3.6 दशलक्ष ते 7.2 दशलक्ष   वार्षिक रोख बोनस देखील देण्यात येणार आहे. 

ऑफिसमध्ये येण्याचं बंधन नाही
मोठ्या पगारासह निकोल यांना कंपनीकडून अनेक सुविधाही देण्यात आल्या आहेत. त्यांना देण्यात आलेल्या ऑफर लेटरमध्ये कंपनीचं मुख्यालय असलेल्या सिएटलमध्ये दररोज येणं बंधनकारक नसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. गरज वाटली तरच घर ते ऑफिस जाण्यासाठी खासगी कार आणि ड्रायव्हर उपलब्ध करुन देण्यात येईल असंही त्यांना सांगण्यात आलं आहे. 

स्टारबक्स कंपनीकडून निकोल यांना न्यूपोर्ट बीचवर एक छोटसं रिपोट ऑफिस सुरु केलं जाणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. इतकंच नाही तर घर आणि मुख्यालयादरम्यानचा प्रवास करण्यासाठी ते स्टारबक्सच्या खासगी विमानाचाही वापर करु शकतात. कंपनीने केलेल्या निवेदनात 'ब्रायन निकोलने स्वतःला स्टारबक्स उद्योगातील सर्वात प्रभावी नेत्यांपैकी एक असल्याचे सिद्ध केलं आहे. Starbucks मध्ये, त्यांचे वेतन थेट कंपनीच्या आणि सर्व भागधारकांच्या कामगिरीशी जोडलेलं आहे'

नरमसिम्हन यांच्या काळात घसरण
ब्रायन निकोल यांनी स्टारबक्स कंपनीचे सीईओ लक्ष्मण नरसिम्हन यांची जागा घेतली आहे. नरसिम्हन यांनी 17 महिने कंपनीचं नेतृत्व सांभाळलं. पण या दरम्यान कंपनी शेअरच्या किंमतीत 23.9% घसरण झाली. तर मार्केट कॅपमध्येही 32 अरब डॉलरची घट झाली.