कार चालकाने चोरट्यांना घडवली अद्दल...Video पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही....

जर अचानक तुम्हाला बंदूकधारी चोरांनी घेरलं तर अशावेळी तुम्ही काय कराल? 

Updated: Jul 24, 2022, 03:59 PM IST
कार चालकाने चोरट्यांना घडवली अद्दल...Video पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही....  title=

Viral Video:चोरट्यांचा अनेक शहरात धुमाकूळ घातल्याचा बातम्या आपण बघतो आणि वाचतो. परदेशातही घरफोडी, चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात होत असतात. बंदूकधारी चोरांना पाहिल्यावर तुमचं काय होईल? जर अचानक तुम्हाला बंदूकधारी चोरांनी घेरलं तर अशावेळी तुम्ही काय कराल? साधारण लोक घाबरतात, चोरांना आपल्याजवळील असलेल्या गोष्टी देऊन टाकतात. बाईकवरुन सोनसाखळी चोरी, गाड्यांची चोरी ऐकली आहे. जर या चोरांशी दोन हात करण्याचा आपण विचार केला तर ते हत्या करायला पण मागेपुढे पाहत नाही. 

ये हुई ना बात...

सोशल मीडियावर चोरट्यांचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक कार घरात आत शिरते. त्यानंतर या कारच्या पाठोपाठ एक अजून कार आत घुसते. या कारमधील 3 चोर बंदूक घेऊन कारवर हल्ला करतात. त्यांनी त्या कारमधील चालकाला दरवाजा उघडण्यास सांगितलं. मात्र या कार चालकाने न घाबरता त्याने समजूतदारपणा दाखवला आणि कारचा दरवाजा उघडला नाही. त्यानंतर कार चालकाने जे काही केलं ते पाहून तुम्ही थक्क व्हाल. या कारचालकाने या चोरट्यांना चांगलीच अद्दल घडवली. काही वेळातच या चोरांना कळलं की आपण चुकीच्या माणसाशी पंगा घेतला आहे.

हा व्हिडीओ ट्विटरवर Figen Sezgin नावाच्या आयडीवर शेअर करण्यात आला आहे. केवळ 54 सेकंदचा या व्हिडीओला आतापर्यंत 73 हजारपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आला आहे. या व्हिडीओला हजारो लाइक्स आले आहेत. तर यूजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.