तुम्ही बघितली का अशी बहादूर मांजर... व्हिडीओ पाहून तुम्ही पण व्हाल थक्कं

या मांजरीला बघून तुम्ही नक्की म्हणाल, बहादूर आणि सिंघम मांजर आहे. या मांजरीने सापाला जे काही झोडपलं आहे, ते पाहून तुम्ही हैराण व्हाल.

Updated: Jul 8, 2022, 09:32 PM IST
तुम्ही बघितली का अशी बहादूर मांजर... व्हिडीओ पाहून तुम्ही पण व्हाल थक्कं title=

मुंबई - साप हा असा प्राणी आहे ज्याला भलेभले लोकं घाबरता. अगदी मोठे प्राणीही सापापासून दोन हात दूर राहतात. काही साप तर खूप विषारी असतात. सापाच्या हल्ल्यात माणसाचा जीव पण जाऊ शकतो. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ युजर्सचं लक्ष वेधून घेत आहे. सापासोबत एक प्राणी मोठ्या शूरवीरप्रमाणे टक्कर देत आहे.

सिंघम मांजर
हो, या मांजरीला बघून तुम्ही नक्की म्हणाल, बहादूर आणि सिंघम मांजर आहे. या मांजरीने सापाला जे काही झोडपलं आहे, ते पाहून तुम्ही हैराण व्हाल.  या मांजरीने सापाची सगळी मस्ती एका सेकंदात काढून टाकली.

मांजरीत कुठून आली येवढी शक्ती?
या व्हिडीओत मांजर सापाला अनेक वेळा आपल्या पंजाने मारताना दिसत आहे. हे पाहून नेटकरी देखील थक्क झाले आहे. या मांजरीची बहादुरी पाहून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरील bestpet.in नावाच्या अकाऊंटवर पोस्ट केला गेला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे.