पहिल्याच वाढदिवसाला मुलाचा दुर्दैवी अंत, खेळताना 12 व्या मजल्यावरून खाली कोसळला

खेळता खेळता मुलगा खाली पडला आणि.... 

Updated: Aug 24, 2021, 07:06 AM IST
पहिल्याच वाढदिवसाला मुलाचा दुर्दैवी अंत, खेळताना 12 व्या मजल्यावरून खाली कोसळला  title=

मुंबई : मुलांना अगदी डोळ्यात तेल घालून सांभाळावं लागतं असं म्हटलं जातं. हे काही चुकीचं नाही. जरा नजर हटली की मुलं काय करतील याचा काही नेम नाही. अगदी त्याचं खेळणं जीवावर बेतू शकतं. एक वर्षाचा मुलगा 12 व्या मजल्यावरून खाली कोसळला. यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलाचा वाढदिवसादिवशीच मृत्यू झाला आहेय हा प्रकार ग्रेटर नॉएडामध्ये घडलाय.

धक्कादायक बाब म्हणजे सोमवारी मुलाच्या घरातील मंडळी त्याच्या वाढदिवसाची तयारी करत होते. हा प्रकार ग्रेटर नॉएडीमधील बिसरख ठाणे क्षेत्रातील आहे. ग्रीन वन हाऊसिंग सोसायटीत राहणारे सत्येन्द्र कसानाला एक वर्षांचा मुलगा रिवान कसाना. रिवान आपल्या 12 व्या मजल्यावरील घराबाहेर खेळत होता. खेळता खेळता रिवान 12 व्या मजल्यावरून शिड्यांवरील रेलिंगमधून थेट खाली कोसळला. रिवान कसानाचा यामध्ये मृत्यू झाला आहे. 

सोमवारीच रिवान कसानाचा पहिला वाढदिवस. रिवान कसाना एका वर्षांचा झाला होता. आपल्या मुलाच्या वाढदिवसाची तयारी करण्यात त्याचे आई-वडिल व्यस्त होते. काही पाहुणे मंडळी देखील घरी आले होते. सगळीकडे अगदी आनंदाच वातावरण होतं. मात्र अचानक या आनंदात मिठाचा खडा पडला. आता कसाना कुटुंबावर दुःखाचं सावट आहे. 

या घटनेने कसाना कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलाचा आकस्मात झालेला मृत्यू कुटुंबियांसाठी मोठा धक्का आहे. वाढदिवसादिवशीच ही घटना घडल्यामुळे मोठा धक्काच सगळ्यांना बसला आहे. मुलांकडे खेळताना बारिक लक्ष ठेवावं लागतं. मुलांची एक चूक त्यांच्या जीवावर बेतू शकते. हीच गोष्ट या प्रकारात घडली आहे.