चीनी वैज्ञानिकांची मोठी चूक, 'स्पेस लॅब' खाणार माती?

चीनी वैज्ञानिकांच्या एका मोठ्या चुकीचा परिणाम सगळ्या जगाला भोगावा लागणार असल्याचं दिसतंय 

Updated: Jan 10, 2018, 03:53 PM IST
चीनी वैज्ञानिकांची मोठी चूक, 'स्पेस लॅब' खाणार माती? title=

बिजिंग : चीनी वैज्ञानिकांच्या एका मोठ्या चुकीचा परिणाम सगळ्या जगाला भोगावा लागणार असल्याचं दिसतंय 

चीनच्या म्हणण्यानुसार, येत्या काही महिन्यात चीनचं पहिलं मानवरहीत स्पेस लॅब (अंतराळातील प्रयोगशाळा) टीयांगोंग-१ नियंत्रित स्थितीत पृथ्वीला धडकणार आहे. या धडकेमुळे पृथ्वीचं कोणतंही नुकसान होणार नाही, असा दावाही चीननं केलाय. 

जमिनीवर प्रवेश करतानाच या स्पेस लॅबचा मोठा भाग जळून खाक होणार आहे. उरलेले तुकटडे प्रशांत महासागरात कोसळतील, असं चीनचं म्हणणं आहे. 

परंतु, वैज्ञानिकांच्या आश्वासनानंतरही चुकून स्पेस लॅबचे काही तुकडे मानवी वस्ती असलेल्या भागांत कोसळले तर भयंकर हानी होऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी चीनी वैज्ञानिक डोळ्यांत तेल घालून प्रयत्न करत आहेत. चीननं आपल्या स्पेस लॅबवरचं नियंत्रण हरवल्याची बातमी पश्चिमी देशांतील मीडियानं दिली होती. 

चीननं २०११ साली हे स्पेस लॅब अंतराळात धाडलं होतं. पृथ्वीवर याचे काही भाग धडकले तर त्यातून निघणारे विषारी रसायनं लोकांना कॅन्सरला तोंड द्यावं लागू शकतं.