कोरोनामुळे स्पेनमध्ये २४ तासात १०० मृत्यू, २ हजार नवे रुग्ण

स्पेनमध्ये गेल्या २४ तासात कोरोनाचे २ हजार रुग्ण आढळले आहेत. 

Updated: Mar 15, 2020, 11:33 PM IST
कोरोनामुळे स्पेनमध्ये २४ तासात १०० मृत्यू, २ हजार नवे रुग्ण title=

मदरीद : स्पेनमध्ये गेल्या २४ तासात कोरोनाचे २ हजार रुग्ण आढळले आहेत. तर मागच्या २४ तासात १०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत ७,७५३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे स्पेनमध्ये मृत्यू झालेल्यांचा आकडा २८८ पर्यंत पोहोचला आहे.

भारतामध्ये आतापर्यंत कोरोनाचे २ बळी गेले आहेत. दिल्लीमध्ये कोरोनामुळे एका वृद्ध महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या महिलेचा मुलगा इटलीवरुन परत आला होता. या महिलेला मधुमेह होता. तसंच तिला कफही झाला होता.

कर्नाटकच्या कलबुर्गीमध्ये एका ७६ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार मृत झालेली व्यक्ती २९ फेब्रुवारीला सऊदी अरबच्या जेद्दाहहून परत आली होती. कोरोनाची लक्षण आढळल्यानंतर या व्यक्तीला नातेवाईकांनी १० मार्चला हैदराबादच्या एका रुग्णालयात दाखल केलं. चांगल्या उपचारांसाठी कुटुंब रुग्णाला पुन्हा कलबुर्गीला आणत होतं, पण रस्त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.

भारतामध्ये महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक म्हणजेच ३३ रुग्ण आढळले आहेत. पुण्यामध्ये कोरोनाचे १६ रुग्ण, मुंबईत ५, नागपुरात ४, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड आणि अहमदनगरमध्ये प्रत्येकी १ रुग्ण सापडला आहे.