खतरनाक ओमिक्रॉनबाबत लंडनच्या संस्थेकडून मोठा खुलासा, पाहा याबाबत काय म्हटलंय

ओमिक्रॉन व्हायरसला 'अत्यंत सांसर्गिक चिंताजनक प्रकार' म्हटले आहे. 

Updated: Nov 28, 2021, 05:11 PM IST
खतरनाक ओमिक्रॉनबाबत लंडनच्या संस्थेकडून मोठा खुलासा, पाहा याबाबत काय म्हटलंय title=

मुंबई : कोरोनाचा एक नवीन व्हेरिएंट जगात आल्याची सगळीकडे चर्चा सुरू आहे. आधीच लोकं कोरोनाने त्रस्त होते, त्यात कोरोनाच्या नव्या डेल्टा व्हेरिएंटने लोकांना घाबरवले आणि आता त्यातुन सगळे सावरतोय तोच आता एका नवीन व्हेरीएंटची चर्चा होत आहे, ज्यामुळे सगळेच घाबरले आहेत. कोविड-19 साथीच्या आजाराचा उद्रेक झाल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी संपूर्ण जग नव्या व्हेरिएंटशी झुंजत आहे. कोरोना व्हायरसचा हा प्रकार लसीद्वारे प्रदान केलेल्या संरक्षणास अपयशी ठरण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. डब्ल्यूएचओच्या समितीने कोरोना विषाणूच्या नवीन स्वरूपाचे नाव 'ओमिक्रॉन' असे ठेवले आहे. 

लंडनच्या यूसीओएल जेनेटीक्स इन्स्टीट्यूट शास्त्रज्ञाचं मत

ओमिक्रॉन व्हायरसला 'अत्यंत सांसर्गिक चिंताजनक प्रकार' म्हटले आहे. यापूर्वी या श्रेणीमध्ये कोरोना विषाणूचे डेल्टा स्वरूप होते. ज्यामुळे युरोप आणि अमेरिकेतील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

दक्षिण आफ्रिकेत या ओमिक्रॉनच्या फैलावाबाबत चिंता व्यक्त केली जात आहेत. याचा प्रसार वेगाने होत आहे. एचआयव्ही/एड्सच्या रुग्णातून त्यांचा संसर्ग झाल्याची शक्यता लंडनमधील ‘यूसीएल जेनेटिक्स इन्स्टिट्यूट’च्या एका शास्त्रज्ञाने व्यक्त केली आहे. आफ्रिकी देशांत तशा घटना आढळल्या आहेत. यामुळे डेल्टा, डेल्टा प्लस आणि अन्य प्रकारांपेक्षा धोकादायक मानला जात आहे.

कोरोनाच्या 'या' स्ट्रेनने संपूर्ण जगाला घाबरवलं 

कोरोना विषाणूचे नवीन रूप दिसल्यापासून, जगातील विविध देश दक्षिण आफ्रिकन देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवरती निर्बंध लावत आहेत. जेणेकरून या प्रकारचा नवीन स्वरूपाचा प्रसार रोखता येईल.

डब्ल्यूएचओच्या सल्ल्यानुसार ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, इराण, जपान, थायलंड, अमेरिका, युरोपियन युनियन देश आणि ब्रिटनसह अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकन देशांमधून प्रवासावर निर्बंध लादले आहेत.

विमानांचे कामकाज बंद असतानाही हा प्रकार पसरत असल्याचे पुरावे आहेत. बेल्जियम, इस्रायल आणि हाँगकाँगमधील प्रवाशांमध्ये नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जर्मनीतही एक प्रकरण समोर आले आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या दोन विमानांमध्ये 61 प्रवाशांना कोविड-19 ची लागण झाल्याचे आढळल्यानंतर हॉलंडमधील अधिकारी रीडिझाइनची चौकशी करत आहेत.

दक्षिण आफ्रिकेकडून मोठा निर्णय 

दक्षिण आफ्रिकेच्या तज्ञांनी सांगितले की, "हा प्रकार लोकांना अधिक गंभीरपणे आजारी बनवू शकतो की नाही हे अद्याप कोणतेही संकेत नाहीत. इतर प्रकारांप्रमाणे, काही संक्रमित लोकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. काही जनुकीय बदल चिंताजनक वाटत असले तरी सार्वजनिक आरोग्याला किती धोका आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बीटा फॉर्म सारख्या पहिल्या काही फॉर्मने सुरुवातीला शास्त्रज्ञांना काळजी वाटली, पण त्याचा तितकासा प्रसार झालेला नाही."