कोरोनामुळे मृत्यूचं तांडव, 166 दिवसांत गाठला विक्रमी मृतांचा आकडा

पुढच्या 2-3 आठवड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता 

Updated: Jun 18, 2021, 07:36 AM IST
कोरोनामुळे मृत्यूचं तांडव, 166 दिवसांत गाठला विक्रमी मृतांचा आकडा

मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसमुळे आजही हजारो लोकांचे जीव जात आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लाखो लोकांनी आपले जीव गमावले. यानंतर दुसऱ्या कोरोनाच्या लाटेतही अनेकांचा मृत्यू झाला. आता काही देशात कोरोनाची तिसरी लाट देखील आली आहे. (Corona virus related deaths have surpassed 4 million worldwide)  तेथेच एका रिपोर्टनुसार, आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे 40 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. 

अनेक देशात कोरोना प्रतिबंधात्मक लस लावली जात आहे. मात्र असं असलं तरीही कोरोना व्हायरस चिंताजनक होत आहे. एल्फा ते सर्वात खतरनाक कोरोना वेरिएंट डेल्टा आजही लोकांना बाधित करत आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोना व्हायरसमुळे 20 लाख लोकांचा मृतांचा आकडा गाठायला एक वर्ष लागलं. मात्र दुसऱ्या लाटेत 20 लाख कोरोनाबाधितांचा आकडा हा अवघ्या 166 दिवसांत नोंदवला गेला आहे. 

जगभरातील एकूण कोरोनाबाधित मृतांचा विचार केला तर अमेरिका, ब्राझील, भारत, रूम आणि मेक्सिको या पाच देशात एकूण 50 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. तर पेरू, हंगरी, बोस्निया, चेक गणराज्य आणि जिब्राल्टरमध्ये मृत्यांचा आकडा सर्वाधिक आहे. 

अनेक देशात तरूण सर्वाधिक प्रभावित 

बोलिविया, चिली आणि उरूग्वे येथील रूग्णालयात मोठ्या प्रमाणात 25 ते 40 वर्ष वयोगटातील व्यक्ती कोरोनाबाधित झाले आहेत. कारण पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेत युवा सर्वाधिक संक्रमित झाले आहेत. तेथेच ब्राझिलच्या साओ पाऊलोमध्ये आयसीयूमध्ये 80 टक्के कोरोनाबाधित होते. 

स्मशानभूमीची जाणवली कमतरता 

विकसनशील देशात कोरोनाबाधितांचा आकडा एवढा वाढला आहे की, स्मशानभूमीची कमतरता जाणवली आहे. भारत आणि ब्राझील या दोन देशात सात दिवसांच्या तुलनेत सर्वाधिक मृतांचा आकडा समोर आला आहे. या देशात आजही स्मशानभूमीत मृतांना जागा नाही.