फ्लोरिडा: कधीकधी सार्वजनिक ठिकाणी लोक सर्व हद्द पार करून वागतात. याचा कधी त्यांना फटका बसतो तर कधी लोक लाजेनं मान खाली घालतात. तर काहीवेळा तिथे वादाचं वातावरण निर्माण होतं. एका पबमध्ये चक्क रोमान्स करणाऱ्या अति उत्साही कपलला मोठा दंड भरावा लागला आहे.
पबच्या टॉयलेटमध्ये महिलेला शारीरिक संबंध ठेवणं चांगलंच महागात पडलं आहे. त्या बदल्यात महिलेला मोठा दंड भरावा लागला आहे. पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. रोमान्स करत असताना या महिलेनं पबच्या टॉलटेलमधील सिंक तोडल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे पब मालकाला मोठं नुकसान सहन करावं लागलं.
पोलिसांनी तातडीनं महिलेला अटक करून 40 हजार रुपयांचा दंड लावला आहे. डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार अटक करण्यात आलेल्या महिलेनं कबुली दिली. ही घटना घडल्यानंतर दोघांनाही पबमधून तातडीनं बाहेर काढण्यात आलं.
सुरुवातीला महिलेनं नखरे केले त्यानंतर आपला गुन्हा कबूल केला. तिने आपल्या बॉयफ्रेंडसोबत संबंध ठेवत असताना सिंक तुटल्याचं तिने सांगितलं. मात्र सिंक कसं तुटलं याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी ती तयार झाली नाही. तिने उडवाउडवीची उत्तरं दिली.
पोलिसांना नोंदवलेल्या जबाबात महिलेने कबूल केले की तिचे आणि तिच्या मित्राचे बाथरूममध्ये संबंध होते. याच दरम्यान सिंक देखील तुटला. ही घटना घडली तेव्हा ती अंमली पदार्थाच्या आहारी गेली होती का? तिचं मानसिक स्वास्थ ठिक होतं का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक अहवालात महिला नशेत होती असं समोर आलं आहे. पब मालकाच्या तक्रारीवरून महिलेवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही अशी घटना घडली होती, मात्र महिलेने तिच्या मित्राविषयी तपशील सांगण्यास नकार दिला आहे. ही धक्कादायक घटना अमेरिकेतील फ्लोरिडा इथली असल्याची माहिती मिळाली आहे.