धक्कादायक! 11 दिवस प्रेतयात्रा, वाढदिवस, दारु पिणे, हसण्या-रडण्यावरही मनाई...यापेक्षा लॉकडाऊन बरा

काय असते लोकशाही आणि ठोकशाही ? ११ दिवसांचा सर्वात मोठा कडक 'लॉकडाऊन' | प्रेतयात्रा, वाढदिवस, दारु विक्री, पिण्यावर मनाई, मनोरंजन, मैफल, हसणे, रडणे यावरही मनाई, तुम्ही म्हणाल इथे आहे का लोकशाही?

Updated: Dec 17, 2021, 04:08 PM IST
धक्कादायक! 11 दिवस प्रेतयात्रा, वाढदिवस, दारु पिणे, हसण्या-रडण्यावरही मनाई...यापेक्षा लॉकडाऊन बरा title=

उत्तर कोरिया : राहण्यापासून अगदी बोलण्यापर्यंत आणि हसण्याचंही स्वातंत्र्य आहे. जर या स्वातंत्र्यावर गदा आली तर काय होईल? हा विचारही केला तरी अंगावर काटा येतो. मात्र प्रत्यक्षात असा फतवाच काढण्यात आला आहे. 11 दिवस प्रेतयात्रा, वाढदिवस, दारु पिणे, हसण्या-रडण्यासाठी बंदी लावण्यात आली आहे. 

तब्बल 11 दिवस हसण्यावर, पिण्यावर आणि खरेदीला जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. किम जोंग-उन यांनी शुक्रवारी त्याचे वडील किम जोंग-इल यांच्या 10 व्या पुण्यतिथीनिमित्त हा आदेश जारी केला. ही बंदी उत्तर कोरियामध्ये घालण्यात आली आहे.

किम यांनी शुक्रवारपासून पुढील 11 दिवस देशात राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. त्यामुळे या 11 दिवसांमध्ये तिथल्या लोकांना हसणं, रडणं, प्रेतयात्रा, वाढदिवस काढण्यावर बंदी लावण्यात आली आहे. इतकच नाही तर सामना खरेदी कऱण्यासाठी घराबाहेर जाण्यासही निर्बंध लावण्यात आले आहेत. 

किम जोंग यांनी लागू केलेल्या या निर्बंधांना उत्तर कोरियातील लोकांना पालन कऱणं बंधनकारक आहे. जो या निर्बंधांचं उल्लंघन करेल त्याला अटक करून कठोर शिक्षा देण्यात येईल असं फर्मान काढण्यात आलं आहे.  

या पूर्वी देखील किम जोंग-इल यांच्या पुण्यतिथीवेळी जे लोक दारू पिऊन येत होते. त्यांना अटक करून शिक्षा दिली जात होती असा दावा तिथल्या एक नागरिकाने केला आहे. ज्या लोकांना अटक केलं त्यांचा नंतर मागमूसही लागला नाही असाही दावा त्याने केला आहे.