वॉशिंग्टन : अमेरिकेत (US) शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी (Students) एक नवीन बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील 400 हून अधिक महाविद्यालये आणि विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना लसीकरण संबंधी नियम जारी केले आहेत. त्याअंतर्गत डब्ल्यूएचओने मंजूर केलेल्या लसीचे डोस विद्यार्थ्यांना घेणे बंधनकारक असणार आहे. या नियमामुळे, भारत आणि रशियाच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन समस्या उद्भवली आहे. कारण भारतात विकसित झालेल्या कोवाक्सिन (Covaxin) आणि रशियाने विकसित केलेले स्पुतनिक-व्ही (Sputnik-V) डब्ल्यूएचओने (WHO) मंजूर केलेले नाही.पुन्हा लस घ्यावी लागेल.
न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार कोरोना परिस्थितीत ज्या विद्यार्थ्यांनी कोव्हॅक्सिन किंवा स्पुतनिक-व्हीचे डोस घेतले आहेत, त्यांना अमेरिकेत गेल्यानंतर पुन्हा लस घ्यावी लागेल. अहवालात अमृतसरच्या विद्यार्थिनी मिलोनी दोशी यांना न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे. मात्र कोव्हॅक्सिनचा डोस घेतल्यामुळे, त्यांना कॅम्पसमध्ये पोहोचल्यानंतर पुन्हा कोरोना लसचा एक डोस घेण्यास सांगण्यात आले. ज्या लसींना डब्ल्यूएचओने मान्यता दिली आहे, त्याच लसीचा डोस घेण्यास सांगण्यात आले.
दरम्यान, एकदा संपूर्ण लसीकरणानंतर, पुन्हा लसीकरण करणे योग्य आहे की नाही? याबद्दल हे सुरक्षित आहे की नाही, याबाबत कोणत्याही तज्ज्ञाने काहीही सांगितलेले नाही. मिलोनी म्हणतात, 'मला दोन वेगळ्या लस घेण्याची भीती वाटते.' अर्थात ही चिंता केवळ मिलोनीचीच नाही, तर अमेरिकेत शिकण्यासाठी गेलेल्या शेकडो भारतीय विद्यार्थ्यांची (Indian Students) आहे.
डब्ल्यूएचओने आतापर्यंत तातडीच्या वापरासाठी 8 लसींना मान्यता दिली आहे. यापैकी तीन लस अमेरिकेत आहेत. या लस फाइझर-बायोटेक, मोडर्ना आणि जॉन्सन आणि जॉन्सन यांचा समावेश आहे. याशिवाय चीनच्या कोविशिल्ट आणि सिनोव्हॅक यांनाही मान्यता देण्यात आली आहे. अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी जाणारे परदेशी विद्यार्थी चीनमधील सर्वाधिक आहेत आणि भारत दुसर्या क्रमांकावर आहे. चीनच्या सिनोव्हॅकला मान्यता मिळाल्यामुळे आता भारतीय विद्यार्थी सर्वाधिक त्रास होणार आहे.