Crocodile Jumped From Water Attack On Drone: सोशल मीडियावर लाखो व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. यापैकी वन्यप्राण्यांची जीवनशैली असलेल्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. असे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट होताच व्ह्यूज लाखोंच्या घरात जातात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एक मगर पाण्यातून शिकारीवर झेप घेताना दिसत आहे. पण हा प्रयत्न चुकीचा ठरला. हा व्हिडीओ एका ट्विटर युजरने शेअर केला आहे. यात ड्रोन एक्सपर्ट्स एका नदीवर वाइल्ड लाइफ व्हिडीओ (Wild Life Video) तयार करण्याचा प्रयत्न करत होते. पण पाण्यात असलेल्या मगरीची नजर ड्रोनवर पडली. पक्षी असल्याचं भास मगरीला (Crocodile) झाला आणि तिने झेप घेतली. पण ड्रोन एक्स्पर्टने क्षणार्धात ड्रोन वर घेतलं.
मगरीने पाण्यातून घेतलेली झेप पाहून उपस्थितही हैराण झाले. कारण मगरीची झेप पाहण्यासारखी होती. कारण इतकी वजनदार मगर एवढ्या वर कशी उडी मारू शकते असा प्रश्न सर्वांना पडला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही तसंच म्हणाल. अवघ्या क्षणात ड्रोन वर घेतलं म्हणून अन्यना ड्रोन मगरीच्या जबड्यातच असतं. व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Impressive pic.twitter.com/AfBG40jXkV
— Tansu YEĞEN (@TansuYegen) November 4, 2022
5 नोव्हेंबरला पोस्ट केलेला 11 सेकंदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. तसेच अनेकांनी रिट्वीट केलं आहे आणि आपल्या प्रतिक्रिया देखील नोंदवल्या आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, "आम्हाला ड्रोनने घेतलेला व्हिडीओ पाहायचा आहे. प्लीज लवकर पोस्ट करा." दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, "ड्रोनचं काय खरं नव्हतं. पुन्हा असा प्रयन्त करून पाहू नका. नाहीतर ड्रोन मगरीच्या पोटात असेल."