मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२० हे वर्ष संपूर्ण जगाला हादरवणारं ठरलं. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच कोरोनाची लस आली त्यामुळे नागरिकांनी थोडा सुटकेचा निःश्वास सोडला. पण कोरोना लसीचा वेगळा परिणाम शरीरावर होताना दिसत आहे. अमेरिकेत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अमेरिकेतील मियामी (Miami) शहरात डॉक्टर ग्रेगरी माइकल (Gregory Michael)यांचा मृत्यू झाला. डॉक्टरच्या पत्नीने या मृत्यूला कोरोना व्हॅक्सीन फाइजरला जबाबदार धरलं आहे. डॉक्टर माइकलने १८ डिसेंबर रोजी फाइजर कोरोना लस घेतली होती आणि १६ दिवसांनंतर तिचा मृत्यू झाला.
डॉक्टर ग्रेगरी माइकलची पत्नी हेइदी नेकेलमान (Heidi Neckelmann) असा दावा केला आहे की, लस घेण्या अगोदर तिच्या नवऱ्याची तब्बेत अतिशय उत्तम होती. डॉक्टर खूप ऍक्टिव होते. लस घेण्याअगोदर त्यांना कोणताच आजार नव्हता. मात्र व्हॅक्सीनेशननंतर त्यांची तब्बेत अचानक बिघडली.
डॉक्टर ग्रेगरी माइकलच्या मृत्यूनंतर फाइजर (Pfizer) कंपनीने सफाई दिली आहे. कंपनीच्या प्रवक्तांनी म्हटलंय की,'आम्हाला डॉ. ग्रेगरी यांच्या मृत्यूची बातमी मिळाली. आम्ही याची चौकशी करत आहोत. पण आम्हाला असं वाटतं नाही की, 'डॉक्टरांच्या मृत्यूचा संबंध थेट फाइजर कोरोना लसीशी आहे.'
डॉक्टर ग्रेगरीच्या पत्नीने सांगितलं की, 'लस घेतल्यानंतर कोणताच साइड इफेक्ट दिसली नाही. मात्र ३ दिवसांनी त्यांच्या हाता आणि पायावर लाल चट्टे दिसत होते. यानंतर जेव्हा तिने माऊंट सिनाई मेडिकल सेंटरमध्ये आपली चाचणी केली. डॉक्टरांच्या प्लेटलेट्स खूप कमी झाले होते. अगदी झिरोपर्यंत पोहोचले होते.'