VIDEO : ‘भूता’सोबत मस्ती करताना मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस ट्रम्प !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया भूतासोबत मस्ती करताना बघायला मिळाले. व्हाईट हाऊसमध्ये हॅलोवीननिमित्त शाळकरी मुलांनी भूताचा गेटअप केला होता.

Updated: Nov 1, 2017, 08:51 AM IST
VIDEO : ‘भूता’सोबत मस्ती करताना मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस ट्रम्प ! title=

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया भूतासोबत मस्ती करताना बघायला मिळाले. व्हाईट हाऊसमध्ये हॅलोवीननिमित्त शाळकरी मुलांनी भूताचा गेटअप केला होता.

लहान मुलांसाठी इथे पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया यांनी मुलांसोबत चांगलीच मस्ती केली. 

या कार्यक्रमासाठी २० शाळांमधील सहा हजार पेक्षा जास्त मुलांना बोलवण्यात आलं होतं. ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मुलांसोबत चांगलेच मिसळले आणि त्यांच्यासोबत मस्ती केली. या पार्टीत अनेक मुलांनी भूताचा गेटअप केला होता. हा व्हिडिओ व्हाईट हाऊसच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आलाय. 

काही मुलं वेगवेगळ्या गेटअपमध्ये दिसले. इथे मुलांनी चांगली खाण्या-पिण्याची मजा केली. त्यानंतर ट्रम्प यांनी मुलांना अनेक गिफ्ट्सही दिलेत.