अमेरिकेने WHO शी संबंध तोडले, ट्रम्प यांनी केले जाहीर तर चीनविषयी मोठे विधान

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटना  (WHO) बद्दल मोठे विधान केले आहे.  

Updated: May 30, 2020, 07:10 AM IST
अमेरिकेने WHO शी संबंध तोडले, ट्रम्प यांनी केले जाहीर तर चीनविषयी मोठे विधान

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटना  (WHO) बद्दल मोठे विधान केले आहे. आपण आजपासून WHO बरोबरचे आपले संबंध कायमचे संपवत आहोत. गेले काही दिवस डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन कोरोना विषाणूबाबत माहिती लपत आहे. कोरोनाबाबत महत्वाची माहिती चीन देत नसल्याने आपला राग व्यक्त केला होता. त्याचवेळी चीनची बाजू WHO सातत्याने घेत आहे. त्यांच्या पाठिशी राहत आहे. तसेच चीनला मदतही केल्याने अमेरिकेने इशारा दिला होता. आज अमेरिकेने WHOशी असलेले संबंध तोडले आहेत.

वर्षाला ४० मिलियन डॉलर इतकी कमी रक्कम देवूनही WHOवर चीनचे नियंणत्र आहे. डब्ल्यूएचओ चीनच्या नियंत्रणाखाली आहे तर अमेरिका वर्षाला ४५० मिलियन डॉलर्स देत आहे.ही रक्कम अमेरिकेपेक्षा खूपच कमी आहे.  कोरोना थांबविण्यास डब्ल्यूएचओ सुरुवातीच्या टप्प्यात अपयशी ठरला, कारण आता सुधारणेची गरज आहे, म्हणूनच आज आम्ही डब्ल्यूएचओ बरोबरचे आपले संबंध संपवत आहोत, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

 डब्ल्यूएचओला देण्यात येणारा निधी आता सार्वजनिक आरोग्यासंदर्भात काम करणार्‍या कोणत्याही अन्य संस्थेला हा निधी आम्ही देऊ असे सांगून ट्रम्प पुढे म्हणाले, गेल्या काही वर्षांत चीन सरकारने आमची औद्योगिक गुपिते चोरण्यासाठी चुकीची हेरगिरी केली आहे. आज मी आपल्या देशातील महत्त्वाच्या विद्यापीठाच्या संशोधनाचे अधिक चांगले रक्षण करण्यासाठी एक घोषणा जारी करेन आणि संभाव्य विदेशी जोखीम म्हणून ओळखल्या जाणार्‍या चीनमधील काही परदेशी नागरिकांच्या प्रवेशास प्रतिबंधित करीन. 

चीन सरकारच्या हाँगकाँगविरुद्धच्या नव्या निर्णयामुळे त्याची विश्वासार्हता कमी होत आहे.  हा हाँगकाँगमधील लोक, चीनमधील लोक आणि खरोखर जगातील लोकांसाठी ही एक शोकांतिका आहे, असे ट्रम्प म्हणालेत. चीनने आपल्या एक देश, दोन सिस्टिमच्या वादा आता एक देश, एक सिस्टिममध्ये बदलला आहे. यामुळे मी माझ्या प्रशासनाला निर्देश देत आहे की,  हाँगकाँगला स्वतंत्र आणि विशेष दर्जा देणारे धोरण समाप्त करण्याची प्रक्रिया सुरु  करण्याचे निर्देश देत आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

आम्ही हाँगकाँगच्या प्रवासी अॅडवायजरीत सुधारणा करु. वुहान विषाणूला चीनने  जगभर आजार पसरला आणि जागतिक महामारी निर्माण झाली, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्याचेवेळी या महामारीमुळे आज एक दशलक्षाहून अधिक अमेरिकन आणि जगातील लाखो लोकांचा बळी घेतला.