Donald Trump Under Arrest : डोनाल्ड ट्रम्प यांना अटक; पॉर्न अभिनेत्रीचे गंभीर आरोप

Donald Trump Under Arrest :  पॉर्न अभिनेत्रीने केलेल्या आरोपा प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प  मॅनहटन कोर्टात सुनावणीसाठी हजर झाले होते. त्यावेळी याच पोर्न स्टार केसमध्ये पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पॉर्न स्टार स्ट्रॉर्मी हिला पैसे दिल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर केला आहे. 

Updated: Apr 4, 2023, 11:42 PM IST
Donald Trump Under Arrest : डोनाल्ड ट्रम्प यांना अटक; पॉर्न अभिनेत्रीचे गंभीर आरोप title=

Donald Trump Hush Money Case:  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना अखेर अटक झाली आहे. एका पॉर्न अभिनेत्रीने (Porn Actress)  ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणीच डोनाल्ड ट्रम्प यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची अटक ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वात मोठी घडामोड आहे.  स्टॉर्मी डेनियल्सने (Stormy Daniels) ट्रम्प यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. 

पॉर्न अभिनेत्रीने केलेल्या आरोपा प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प  मॅनहटन कोर्टात सुनावणीसाठी हजर झाले होते. त्यावेळी याच पोर्न स्टार केसमध्ये पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पॉर्न स्टार स्ट्रॉर्मी हिला पैसे दिल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर केला आहे. मार्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ज्युरींनी ट्रम्प यांच्यावर खटला चालवण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार आता ट्रम्प यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवण्यात येणार आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

2016 साली पॉर्न अभिनेत्री स्टॉर्मी डेनियल्सने (Stormy Daniels) ट्रम्प यांच्यावर आपले पैसे थकवल्याचा आरो केला होता. ट्रम्प आणि स्टार्मी यांचे प्रमे संबंध होते. हे संबंध लपवण्यासाठी त्यांनी 2016 साली ट्रम्प यांनी डेनियल्स यांना 1 लाख 30 हजार डॉलर्सची रक्कम दिली होती. ट्रम्प यांनी स्टार्मीबरोबर आपले संबंध असल्याचा दावा फेटाळला होता.  मॅनहॅटन कोर्टाच्या ग्रॅण्ड ज्युरीने ट्रम्प यांना दोषी ठरवले. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे राजकीय भवितव्य धोक्यात

पॉर्न अभिनेत्रीने केलेल्या आरोपांमुळे डोनाल्ड ट्रम्प यांना अटक केली आहे. यामुळे त्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे. ट्रम्प यांच्याविरोधात अभियोग खटला दाखल झाल्यास ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले असे माजी राष्ट्राध्यक्ष असतील त्यांच्याविरोधात असा खटला चालवला जाईल. यामुळे 2024 मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी मागील वर्षीच पुन्हा एकदा आपण राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असल्याची घोषमा केली होती. पॉर्न केस प्रकरणात अडकल्याने निवडणूक लढवण्याचं स्वप्न अपूर्ण राहू शकतं.