Wildlife Video: ससाण्याने शिकार करण्यासाठी सशावर झेप घेतली पण...; थरार कॅमेरात कैद

Eagle and Rabbit Fight Viral Video: सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडीओमधील सशाच्या बुद्धीमत्तेचं कौतुक केलं आहे.

Updated: Jan 24, 2023, 02:41 PM IST
Wildlife Video: ससाण्याने शिकार करण्यासाठी सशावर झेप घेतली पण...; थरार कॅमेरात कैद
Eagle and Rabbit Fight Viral Video

Eagle and Rabbit Fight Video: जगातील सर्वात धोकादायक शिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राण्यांमध्ये सिंह आणि मगरी यांच्या व्यकतीरिक्त ससाणा अथवा घारीचं नाव घ्यावं लागेल. या पक्षाचं वैशिष्ट्य म्हणजे तो आपल्या लक्ष्यावर एवढ्या वेगाने तुटून पडतो की कोणाला काही कळण्याआधीच शिकार झालेली असते. लहान आकाराच्या जानवरांना तर अगदी सहज उडवून नेण्याची कला या पक्षाला अवगत आहे. याच कारणामुळे माळरानावरील छोट्या प्राण्यांबरोबरच पाण्याच्या पातळीजवळ वावरणाऱ्या माशांमध्येही या पक्षाचं विशेष भय असतं.

आपल्या मजबूत पंखांच्या जोरावर या पक्षाला शिकार करणं सहज शक्य होतं. या पंखांच्या जोरावरच हा पक्षी सहज शिकार करतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. फार दुरुनच गवत खाणाऱ्या सश्याला पाहून हा ससाणा आकाशात भरारी घेण्याच्या इराद्याने जमीनीच्या दिशेने झेपावतो. मात्र ऐनवेळी हा ससा असं काही करतो की हा सर्वात सक्षम शिकारीही काही क्षण गांगरुन जातो आणि शिकार त्याच्या पंजामधून सुटते.

व्हायरल व्हिडीओमध्ये हा ससाणा शेतामधील सशाची शिकार करण्याच्या इराद्याने खाली उतरु लागतो. आता या सशाचं काही खरं नाही, या ससाण्याच्या पंजात ससा सापडणार आणि ससाण्याचा डाव यशस्वी ठरणार असं वाटत असतानाच ससा असं काही करतो की ससाणा चक्रावून जातो. ससाणा आपल्या पंजाने सशावर झडप घालणार इतक्यात ससा हवेत उलटी उडी मारतो आणि दुसऱ्या बाजूला झेप घेतो. सशाने अनपेक्षितपणे मारलेल्या या उडीमुळे ससाणा गोंधळून जातो. मात्र काही कळण्याच्या आधीच ससा या ससाण्याच्या तावडीतून निसटलेला असतो. तुम्हीच पाहा हा व्हायरल व्हिडीओ...

सशाने आपला जीव वाचवण्यासाठी दाखवलेली चपळता पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ 12 जानेवारी रोजी पोस्ट करण्यात आला असून त्याला 10 हजारांहून अधिक जणांनी लाइक केलं आहे. व्हिडीओमध्ये सशाने दाखवलेल्या चपळतेचं कौतुक केलं आहे तर अनेकांनी त्यांच्या बुद्धीमत्तेला सलाम केला आहे.