Personality Test : हाताची मूठ सांगणार तुमच्या मनात चाललंय तरी काय? एकदा आजमावून तर पाहा

Interesting Facts : तुम्हाला माहितीये का, व्यक्तिमत्त्वातील अनेक गुणविशेष तुमच्याविषयी बऱ्याच गोष्टी सांगत असतात. यामध्ये काही अशाही गोष्टी असतात ज्यांचा अर्थ जाणून तुम्ही स्वत: थक्क व्हाल. 

Updated: Jan 24, 2023, 02:35 PM IST
Personality Test : हाताची मूठ सांगणार तुमच्या मनात चाललंय तरी काय? एकदा आजमावून तर पाहा
types of hand fist may reveal your personality

fist personality traits: प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. ज्याप्रमाणं प्रत्येक व्यक्तीची शारीरिक रचना वेगळी असते अगदी त्याचप्रमाणं त्या व्यक्तीच्या सवयी आणि आवडीनिवडीसुद्धा तितक्याच वेगळ्या असतात. अनेकजण असं म्हणतात की, एखाद्या व्यक्तीला ओळखायचं असेल तर त्यांच्या कृतीतून ओळखा. कारण या कृतीच त्या व्यक्तीविषयी खूप काही सांगत असतात. यामध्ये चालण्याबोलण्याच्या कृतीपासून हातवारे करण्याच्या कृतींबाबतही हेच निरीक्षण. 

जाणून आश्चर्य वाटेल, पण हातांची मूठ तुम्ही कशी धरता हेसुद्धा तुमच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल खूप काही सांगून जातं. त्यामुळं यापुढे मूठ कशी धरताय याकडे नक्की लक्ष द्या. (personality test)

सर्व बोटं आवळून मूठ बंद करताय? 

तुम्ही जर सर्व बोटं आवळून मूठ बंद करता, तर तुम्ही मितभाषी आहात. इतरांच्या मनातील जाणून घ्यायला तुम्हाला आवडतं. तुम्हाला तुमचा एकाकीपणा फार प्रिय आहे. कलेवर तुमचं विशेष प्रेम. चौकटीबाहेरचा विचार करणाऱ्यांपैकी तुम्ही एक आहात. गर्दीत राहणं तुम्हाला पसंत नसल्यामुळं सातत्यानं तुम्ही निवांतपणा शोधत असता. तुम्हाला वाटेत कुणी अडसर भासत असेल तर तुम्ही थेट वाटच बदलता. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकट्यानं राहून आपलं वेगळेपण नकळतपणे सिद्ध करता. 

सर्व बोटं घट्ट आवळून त्यावर अंगठा ठेवता? 

सर्व बोटं आवळून त्यावर तुम्ही अंगठा ठेवता? अशी मूठ असणाऱ्या व्यक्ती फार रचनात्मक असतात. त्यांची मानसिकता प्रचंड सकारात्मक असते. अशा व्यक्ती एखाद्या कामाप्रती आणि दिलेल्या शब्दाप्रती समर्पक असतात. सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावण्यापासून ही मंडळी एक पाऊलही मागे येत नाहीत. एकाच प्रकारच्या साचेबद्ध आयुष्यात दीर्घकाळ राहणं पसंत नसल्यामुळं ही मंडळी सातत्यानं नवनवीन वाटांचे वाटसरू होताना दिसतात. इतरांची काळजी घेतात. अतिशय भावनात्मक विचार असल्यामुळं त्यांना कोणतीही गोष्ट पटकन दुखावते. 

हेसुद्धा वाचा : Richest People In World: अंबानी श्रीमंत व्यक्तींच्या यादीत Top 10 मधून बाहेर; संपत्तीमध्ये मोठी घसरण

 

अंगठा तर्जनीवर ठेवून मूठ बंद करताय? 

जर मूठ बंद करताना तुम्ही अंगठा तर्जनीवर ठेवताय तर तुमच्यामध्ये नेतृत्त्वक्षमता असल्याचं सिद्ध होतं. तुम्ही कायम इतरांसाठी मेहनत घेता, त्यांना प्रगतीपथावर कसं नेता येईल याकडेच तुमचा कल असतो. तुमच्या सामान्य ज्ञानात सातत्यानं भर पडत असते. हे ज्ञान तुम्ही इतरांपर्यंतही पोहोचवता. इतरांप्रती तुम्हाला लगेचच दया वाटते आणि त्यांच्या मदतीसाठी तुम्ही पुढे सरसावता. पण, अनेकदा तुमच्या याच स्वभावाचा गैरफायदाही घेतला जातो. त्यामुळं सावध राहणंही तितकंच गरजेचं.