मुंबईः लहानपणी रात्रीच्या आकाशातील तारे पाहून वाटायचे की, पृथ्वीवरून आकाश असे दिसते, हे तारे, ही आकाशगंगा अशी दिसते, मग तिथून आपली पृथ्वी कशी दिसेल? पण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात अवकाशातून पृथ्वी कशी दिसते हे आपण खरोखर पाहू शकतो का? होय, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पृथ्वी अंतराळातून दाखवण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये पृथ्वी खूपच सुंदर दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक मोठे वर्तुळ फिरताना दिसत आहे. फिरताना त्याचा काही भाग चमकतानाही दिसतो. काही ठिकाणी उजेड असून अनेक ठिकाणी अंधारही दिसत आहे. पुढे व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की अनेक ठिकाणी निळ्या रंगाचा काही भाग देखील दिसत आहे.
त्याच वेळी, व्हिडिओमध्ये काही वेळाने वाळवंटसारखे काहीतरी दिसते. एकूणच, अवकाशातून पृथ्वीचे दृश्य अप्रतिम आहे आणि ते असे आहे की क्षणभर डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण आहे.
Earth at night viewed from space. pic.twitter.com/lWuQhotDEK
— Wonder of Science (@wonderofscience) June 25, 2021
अंतराळातून पृथ्वीचे हे अद्भुत दृश्य पाहून तुम्ही थक्क व्हाल. हे दृश्य खूप सुंदर आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल होत आहे. वंडर ऑफ सायन्स नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.
लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 4.3 मिलियन व्ह्यूज आले आहेत म्हणजेच हा व्हिडिओ 43 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याच वेळी, आतापर्यंत 51 हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे.