चिंता वाढली! जगातील प्रत्येक १० वा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह - WHO

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या पॉझिटिव्ह असलेल्या एकूण संख्येच्या जवळपास २० टक्के अधिक

Updated: Oct 6, 2020, 12:47 PM IST
चिंता वाढली! जगातील प्रत्येक १० वा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह - WHO  title=

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांनी केलेल्या वक्तव्यामुळे चिंता वाढली आहे. सोमवारी तज्ञांनी केलेल्या वक्तव्यामुळे नागरिक चिंतेत आहेत. 'जगभरात प्रत्येक दहावा व्यक्ती कोरोनोबाधित असू शकतो.' WHO ने केलेल्या वक्तव्यानुसार, जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या पॉझिटिव्ह असलेल्या एकूण संख्येच्या जवळपास २० टक्के अधिक असू शकते. 

यासोबतच WHO ने भविष्यात कोरोनाची परिस्थिती अधिक खराब होण्याची चेतावणी दिली आहे. WHO च्या डॉ. मायकल रियान यांनी म्हटलं आहे की,'हे आकडे गावात आणि शहरात वेगवेगळे असू शकतात. तसेच वेगवेगळी वयोमर्यादा देखील असू शकतात. यानुसार, जगभरातील अधिकांना कोरोनाची लागण झाली असेल.'

बैठकीत सांगितल्याप्रमाणे,'महामारीचा संसर्ग अजूनही होत आहे. तसेच संक्रमणापासून वाचण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. या संक्रमणातून अनेकांचा जीव वाचला आहे.' डॉ. रियान यांच्या म्हणण्यानुसार, साऊथ-ईस्ट एशियात कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती जास्त बिघडलेली आहे. यूरोप आणि पश्चिमच्या भागात डेथ रेट सर्वाधिक आहे. तर आफ्रिका आणि पश्चिम देशात कोरोनामुळे परिस्थिती सकारात्मक आहे. 

आमचा असा अनुभव आहे की, जगभरात १० टक्के लोक कोरोनाबाधित आहेत. म्हणझे जगभरातील जवळपास ७६९० करोड लोकसंख्येत जवळपास ७६ करोड लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. WHO नुसार, जगभरात जवळपास ३.५ करोड लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.