अरे रे..या तरुणीला नेमकं झालंय तरी काय? दर तीन मिनिटांनी शुद्ध हरपते, डॉक्टरांनी सांगितलं...

आजार म्हटलं की आयुष्यभराचं दुखणं सोबत घेऊन जगणं असंच म्हणावं लागेल. दुर्दैवाने एका महिलेला अशाच एका दुर्धर आजाराचा सामना करावा लागत आहे. 

Updated: Aug 31, 2022, 03:45 PM IST
अरे रे..या तरुणीला नेमकं झालंय तरी काय? दर तीन मिनिटांनी शुद्ध हरपते, डॉक्टरांनी सांगितलं... title=

Lyndsi Johnson Allergic To Gravity: आजार म्हटलं की आयुष्यभराचं दुखणं सोबत घेऊन जगणं असंच म्हणावं लागेल. दुर्दैवाने एका महिलेला अशाच एका दुर्धर आजाराचा सामना करावा लागत आहे. कारण या महिलेला गुरुत्वाकर्षणाची अॅलर्जी आहे. हो..तुम्ही वाचलं ते अगदी खरं आहे.  गुरुत्वाकर्षणाच्या अॅलर्जीमुळे लिंडसी जॉनसन 23 तास झोपून काढते. तर दिवसातून 10 वेळा बेशुद्ध अवस्थेत जाते. ती 3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ उभी राहू शकत नाही. ती ऑक्टोबर 2015 मध्ये पाठदुखीमुळे त्रस्त होती. त्यानंतर हा आजार बळावला आणि काही वर्षे उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर दिवसातून दहा वेळा शुद्ध हरपू लागली. डॉक्टरांनाही या आजाराचं निदान सापडत नव्हतं. अखेर फेब्रुवारी 2022 मध्ये या आजाराचं नेमकं कारण कळलं.

28 वर्षीय लिंडसी जॉनसन हिला पोस्टुरल टॅचीकार्डिया सिंड्रोम (PoTS) आहे. अशा स्थितीत हृदयाची गती वाढते आणि बसणं किंवा उभं राहणं कठीण होतं. यामुळे गुरुत्वाकर्षणाची अॅलर्जी संदर्भित करते. या आजारावर औषधोपचार सुरु असला तरी ती दिवसातून तीन वेळा बेशुद्धावस्थेत असते. यामुळे ती पूर्णपणे तिचा पती जेम्सवर अवलंबून असते. लिंडसीनं सांगितलं की, "मला गुरुत्वाकर्षण अॅलर्जी आहे. ऐकताना वेगळं वाटेल पण हे खरं आहे. मी तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ उभी राहू शकत नाही"

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'मी जेव्हा बिछाना किंवा जमिनीवर झोपते तेव्हा मला चांगलं वाटतं. त्यामुळे पूर्ण दिवस झोपून काढते. दिवसातील जवळपास 23 तास मी अशा अवस्थेत घालवते. वयाच्या 28 व्या वर्षी मला शॉवर चेअरचा वापर करावा लागेल, असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. यावर कोणतंच औषध नाही पण मी जेम्सचे आभार व्यक्त करते अजून माझ्याकडे दुसरं काहीच नाही.', असं लिंडसीनं पुढे सांगितलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लिंडसी ही माजी नौदल एव्हिएशन मेकॅनिक आहे. परदेशात नौदलात सेवा करत असताना आजारी पडू लागली. तीव्र वेदना नेमकं कारण तेव्हा डॉक्टरांना समजू शकले नाही. 2018 मध्ये, आजारपणामुळे तिला वैद्यकीयदृष्ट्या नौदलातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर सहा महिन्यांनी तिला पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या आणि उलट्या होऊ लागल्या.