vladimir putin health : रशियाचे राष्ट्रपती, व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin health) आरोग्यासंदर्भात दर दिवशी अशी काही माहिती समोर येत आहे, ज्यामुळं जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांच्याच नावाची चर्चा सुरु आहे. (Cancer) कॅन्सर आणि पार्किंन्सन यांसारख्या आजारांशी झुंजणाऱ्या याच पुतिन यांच्याविषयी आता आणखी एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. दावा म्हणण्यापेक्षा एका रशियन पत्रकाराने हा गौप्यस्फोटच केला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण, या दाव्यानुसार पुतिन सध्या जादूटोणा आणि तत्सम प्रकारांना प्राधान्य देऊ लागले आहेत. (fact check Vladimir Putin beleives in Paranormal Activity read details)
रशियावर आपली सत्ता कायम राहण्यासाठी पुतिन यांनी श्वानांसह इतरही काही प्राण्यांचा बळी दिल्याचं कळत आहे. पण, आपल्या या वक्तव्यांना सिद्ध करणारा कोणताही पुरावा मात्र या पत्रकारानं जगासमोर आणलेला नाही.
ओलेग काशिन नावाच्या या पत्रकारानं गेल्या बऱ्याच काळापासून पुतिन हरणांच्या रक्तानं स्नान करत असल्याचं म्हटलं. ऐकून किळस वाटेल, पण अनेकांचाच या वृत्तावर विश्वास आहे. बरं, ते एकटेच असे रशियन नाहीत ज्यांनी अंधश्रद्धांवर विश्वास ठेवला आहे. पण, त्यांच्या सोबत अशी अनेक मंडळी आहेत ज्यांचा या अघोरी प्रकारावर विश्वास आहे, असंही त्यांनी सांगितलं.
सदरील सर्व प्रकारावर पुतिन सोबतच असणाऱ्या केजीबी एजंट जॉर्जी रोगोजिन यांच्यामुळं विश्वास ठेवू लागले. आपण दुसऱ्यांच्या मनात काय सुरुये हे सांगू शकतो, असा दावा जॉर्जी करतात. जॉर्जी रोगोजिन यांनी अमेरिकेचे माजी परदेश मंत्री मेडेलीन अलब्राइट यांच्या मेंदूत शिरकाव केल्याचाही दावा केला होता. तेव्हापासून त्यांना "मर्लिन इन द क्रेमलिन" आणि "नास्त्रेदमस इन युनिफॉर्म" अशा नावांनीही संबोधलं गेलं.
सायबेरियन तांत्रिक अलेक्सांद्र गबीशेव यांच्या नावानं पुतीन यांच्या मनात धडकी भरल्याचं म्हटलं जातं. असं म्हणतात की, 2019 मध्ये पुतिन यांच्या दानवी आत्म्याला शुद्ध करण्यासाठी गबीशेव यांनी अनुष्ठान केलं होतं. पुतीन यांच्या कानावर ही बाब गेली आणि त्यांना हादरा बसला. ज्यानंतर सायबेरियाच्या या तांत्रिकाला अटक करण्यात आली होती.