असंख्य महिलांना धोका! तब्बल 94 मुलांचा बाप निघाला 'हा' डॉक्टर...

एका डॉक्टरच्या कारनाम्यामुळे तुम्हाला धक्का बसू शकतो. तो त्याच्याकडे आलेल्या महिला रुग्णांचा असा उपचार करीत होता की, त्यांच्याच मुलांचा बाप होत होता.

Updated: May 12, 2022, 01:21 PM IST
असंख्य महिलांना धोका! तब्बल 94 मुलांचा बाप निघाला 'हा' डॉक्टर... title=

नवी दिल्ली : एक फर्टिलिटी डॉक्टर 94 मुलांचा बाप असल्याचे समोर आले आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. डॉक्टरने त्याच्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये आपले स्पर्म टाकले. आता नेटफ्लिक्सने या विषयावर एक डॉक्युमेंट्री बनवली आहे.

हे प्रकरण अमेरिकेतील इंडियानापोलिस येथील आहे. येथील डॉ. डोनाल्ड क्लाइन ( Donald Cline) यांच्या सत्यकथेला लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी नेटफ्लिक्सने ' Our Father' नावाचा माहितीपट बनवला आहे. 1970 आणि 1980 च्या दशकात हा डॉक्टर आपल्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या महिला रुग्णांना न सांगता त्याचे स्पर्म टाकायचे.

डॉक्टरचे हे कारनामे त्याची मुलगी जेकोबा बेलाद हिने प्रथम उघड केले. तिचा जन्म शुक्राणू दानातून झाला होता. एके दिवशी तिने घरीच डीएनए चाचणी केली. ज्यामध्ये तिला या डॉक्टरपासून झालेले आणखी सात भावंडे असल्याचे समोर आले. पण धक्कादायक म्हणजे या सर्वांची आई वेगवेगळी होती.

यानंतर या भावंडाच्या ग्रुपने सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये त्यांना समजले - हा डॉक्टर महिलांमध्ये आपले स्पर्म टाकत असे.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर क्लाइनला न्यायालयात नेण्यात आले. त्यावेळच्या कायद्यातील तरतुदीनुसार त्यांनी कोणताही फौजदारी कायदा मोडला नव्हता. त्यानंतर  डॉक्टरकडून सुमारे 40 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आणि त्यालाला सोडून देण्यात आले.

2018 मध्ये, एक कायदा मंजूर करण्यात आला होता, ज्याच्या अंतर्गत इंडियानामध्ये अवैध शुक्राणू डोनर्स बेकायदेशीर मानले जाईल. परंतू अमेरिकेत अद्याप याबाबत कोणताही केंद्रीय कायदा नाही.