समुद्र किनारी फिरताना कुत्र्याला सापडली 'लाख'मोलाची वस्तू, एका क्षणात मच्छिमार झाला मालामाल

Whale Vomit-Treasure Of The Sea: एका मच्छिमाराच्या पाळीव कुत्र्याला समुद्र किनारी फिरताना एक अशी वस्तू सापडली की त्यामुळं तो एका क्षणात मालामाल झाला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 16, 2023, 04:34 PM IST
समुद्र किनारी फिरताना कुत्र्याला सापडली 'लाख'मोलाची वस्तू, एका क्षणात मच्छिमार झाला मालामाल  title=
Fisherman Shocked As Dog Finds Rare Whale Vomit Found On Beach

Whale Vomit-Treasure Of The Sea: समुद्र किनारी फिरत असताना अचानक तुमचं नशीब फळफळलं तर काय कराल. एका व्यक्तीच्या आयुष्यात अशी घटना खरंच घडली आहे. सोशल मीडियामुळं या घटनेचा खुलासा झाला आहे. घटनेबाबत ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. स्कॉटलँडमधील एका मच्छिमाराचे एका क्षणात नशीब उजळले आहे. आपल्या पाळीव कुत्र्याच्या मदतीमुळं त्याला लाखो रुपयांचे घबाड सापडले आहे. 

मच्छिमार त्याच्या पाळीव कुत्र्याला (आयरशायर) घेऊन समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी घेऊन गेला होता. त्याचवेळी समुद्रकिनारी फिरत असतानाच आयरशायरला एक अद्भूत गोष्ट सापडली. ते पाहून मच्छिमार पॅट्रिक विल्यमसन यांचा आनंद गगनात मावत नव्हता. पाळीव कुत्र्याला समुद्राचा खजिना सापडला आहे. ज्याला समुद्रातील तरंगते सोने, असंही म्हटलं जाते

पॅट्रिक विल्यमसन नावाचा मच्छिमार त्याच्या पाळीव कुत्र्याला घेऊन समुद्र किनारी फिरत असताना त्याचवेळी त्यांच्या कुत्र्याला व्हेल माशाची उलटी सापडली आहे. याला एम्बरग्रीस दगड असंही म्हटलं जाते. आता व्हेल माशाच्या उलटीमुळं कोण मालामाल कसं होऊ शकतं, असा विचार तुम्हीदेखील करत असातल तर एम्बरग्रीस म्हणजेच माशाच्या उलटीचा वापर अनेक कारणांसाठी केला जातो. एम्बरग्रीसचा वापर हाय क्वालिटी परफ्युम बनवण्यासाठी तसंच, सेंट आणि ब्युटी इंडस्ट्रीमध्येही माशाच्या उलटीचा वापर केला जातो. याची किंमत लाखोंच्या घरात असते.

पॅट्रिक विलियमसन नावाच्या मच्छिमाराला एम्बरग्रीसचा एक तुकडा मिळाला आहे. त्याचे वजन जवळपास 5.5 औस म्हणजेच 0.34 पाउंड आहेत. एम्बरग्रीस मिळाल्यानंतर पॅट्रिक विलियमसनने म्हटलं आहे की, मी मच्छिमारांच्या बोटीवर काम करतो त्यामुळं एम्बरग्रीस दगड कसा असतो हे मला माहिती आहे. मी याआधी कधीच एम्बरग्रीस पाहिलं नाहीये. मात्र त्याबाबत अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. पॅट्रिक  यांना सापडलेल्या एम्बरग्रीसची किंमत लाखांच्या घरात असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, या आधीही अनेक मच्छिमारांना व्हेल माशाची उलटी सापडली होती. कॅनरी द्विपवर यावर्षाच्या सुरुवातीला 21 पाउंड वजन असलेल्या  एम्बरग्रीसचा तुकडा सापडला होता. याची किंमत $500,000 इतकी होती. यापूर्वीही मच्छिमारांना  एम्बरग्रीसचा 280 पाउंडचा तुकडा सापडला होता. 2021मध्ये त्याची किंमत 1.5 मिलियन डॉलर इतकी होती.