मांस खाणारा बॅक्टेरिया फैलावतोय, लक्षण जाणवताच फक्त 48 तासांत मृत्यू,'या' देशात हाहाकार

Flesh-Eating Bacteria:जपानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.एका विचित्र रोगाचा प्रसार जपानमध्ये फैलावला आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 16, 2024, 02:24 PM IST
मांस खाणारा बॅक्टेरिया फैलावतोय, लक्षण जाणवताच फक्त 48 तासांत मृत्यू,'या' देशात हाहाकार title=
flesh eating bacteria that can kill human in 2 days spreads in Japan

Flesh-Eating Bacteria: जपानमध्ये एक विचित्र आजाराने थैमान घातलं आहे. मांस खाणाऱ्या या बॅक्टेरियामुळं अनेक संक्रमीत झाले आहेत.एकदा का रोगाचा संसर्ग झाला की 48 तासांतच व्यक्तीचा जीव जावू शकतो. कोरोना संक्रमणानंतर हा आजार फैलावत असल्याचे समोर आलं आहे. नॅशनल इन्स्टिट्युड ऑफ इन्फेक्शियस डिसीजनुसार स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम (एसटीएसएस) असं या आजाराचे नाव आहे. या आजाराचा संसर्ग झाल्यानंतर 48 तासांतच आक्रमक रुप धारण करतो. 

नॅशनल इन्स्टिट्युड ऑफ इन्फेक्शियस डिसीजनुसार, या वर्षी 2 जूनपर्यंत जपानमध्ये एसटीएसएसचे 977 प्रकरणे समोर आली आहेत. जे मागील वर्षाच्या तुलनेत जास्त आहेत. ही संस्था 1999 पासून या आजाराच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे.ग्रुप ए स्ट्रेप्टोकोकस (जीएएस)नुसार, लहान मुलांच्या घशाला सूज आणि घशात खवखव निर्माण करते. ज्याला स्ट्रेप थ्रोटम्हणून ओळखले जाते.ब्लूमर्गनुसार, काही प्रकारचे बॅक्टेरियामुळं वेगाने लक्षणे दिसू लागतात. ज्यामुळं अंगदुखी, सूज, ताप, लो ब्लड प्रेशर त्यानंतर नेक्रोसिस, श्वास घेण्यास त्रास, ऑर्गन फेल्युअरमुळं मृत्यू होउ शकतो.

टोकियो महिला चिकित्सा विश्वविद्यालयातील प्रोफेशर केन किकुची यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिक मृत्यू 48 तासांच्या आत झाले आहेत. यात रुग्णांच्या पायांना आलेली सूज दुपारपर्यंत गुडघ्यापर्यंत येते आणि 48 तासांच्या आत मृत्यू होऊ शकतो.वयाच्या 50 पेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना या रोगाचा धोका असतो. किकुची यांनी दिलेल्या माहितीनुसार, जपानमध्ये या रोगामुळं संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या 2500 पर्यंत जाऊ शकते आणि मृत्यू दर 30 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. 

किकुची यांनी लोकांना हाताची स्वच्छता राखण्याचे आणि कोणत्याही खुल्या जखमांवर उपचार करुन घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की रुग्णांच्या आतड्यांमध्ये ग्रुप ए स्ट्रेप्टोकोकस असू शकतो, जो विष्ठेद्वारे हात दूषित करू शकतो. ब्लूमबर्गच्या मते, जपान व्यतिरिक्त, अलीकडेच इतर अनेक देशांमध्ये स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोमचा उद्रेक देखील नोंदवला गेला आहे. 2022 च्या उत्तरार्धात, किमान पाच युरोपीय देशांनी जागतिक आरोग्य संघटनेकडे A स्ट्रेप्टोकोकस (iGAS) रोगाची वाढती प्रकरणे नोंदवली आहेत.