चीनने उचलला काश्मीरचा मुद्दा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी असं केलं गप्प

परराष्ट्र मंत्र्यांनी चीनला दिलं चोख उत्तर

Updated: Aug 13, 2019, 12:08 PM IST
चीनने उचलला काश्मीरचा मुद्दा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी असं केलं गप्प

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या बाबतीत मोदी सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली. भारताच्या या निर्णय़ानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. पाकिस्तान जगभरातील देशांकडे या मुद्द्यावर त्यांचं समर्थन करण्यासाठी मागणी करत आहे. दरम्यान भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीत काश्मीरचा मुद्दा देखील आला. पण परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी असं उत्तर दिलं की, चीन पुन्हा काहीच विचारु शकला नाही.

जम्मू-काश्मीर मधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं की, भारताने घेतलेला निर्णय हा संविधानानुसार आहे आणि यामुळे पाकिस्तान आणि चीनच्या सीमेच्या आत कोणताही फरक पडत नाही. लद्दाखला केंद्र शासित प्रदेश बनवल्यानंतर यावर चीनने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दोन्ही देशांच्या एकत्र पत्रकार परिषदेत अक्साई चीनचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला. पण परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं की, 'भारताच्या या निर्णयानंतर फक्त भारतात फरक पडले. आंतरराष्ट्रीय सीमेवर कोणताच परिणाम होणार नाही.'

जम्मू-काश्मीरवर भारताने घेतलेल्या निर्णय़ानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी चीन दौऱ्यावर आले होते. पण चीनने म्हटलं होतं की, 'भारताच्या निर्णयाबाबत त्यांना माहिती आहे. आम्ही फक्त या क्षेत्रात शांती अपेक्षित करतो.'

भारताच्या या निर्णय़ाचं मात्र अनेक देशांची समर्थन केलं आहे. हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं अनेक देशांनी स्पष्ट केलं आहे. मुस्लीम देशांची देखील पाकिस्तानला साथ मिळालेली नाही.