मुंबई : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी चक्क भारताचं कौतुक केलं आहे. एवढंच नाही तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S, Jaishankar) यांचा व्हिडिओ देखील भर सभेत दाखवला. सत्तेवर असताना भारताविरुद्ध गरळ ओकायची एकही संधी न सोडणाऱ्या इम्रान खान यांनी चक्क आता भारताचं कौतूक केलं आहे.
सत्ता गेल्यानंतर भारताचं महत्त्व इम्रान खान यांना समजलंय. भारताचं आणि भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचं इम्रान खान यांनी आता तोंड भरून कौतुक केलं. पाकिस्तानच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित तहरीके इन्साफ पक्षाच्या रॅलीत त्यांनी चक्क भारतीय परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा व्हिडिओ दाखवला.
अमेरिकेचा दबाव झुगारून रशियाकडून इंधन खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयाचं त्यांनी तोंड फाटेपर्यंत कौतुक केलं. एकीकडं भारताचं कौतूक करताना अमेरिकेपुढं नांगी टाकणा-या पाकिस्तानच्या विद्यमान शाहबाज शरीफ सरकारला खडे बोलही सुनावले आहेत.
Former Pak PM Imran Khan plays out video clip of India's foreign minister Dr S Jaishankar during his mega Lahore Rally on Saturday, pointing out his remarks how India is buying Russian oil despite western pressure. Says, 'yeh hoti hai Azad Haqumat' pic.twitter.com/tsSiFLteIv
— Sidhant Sibal (@sidhant) August 14, 2022
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकाचवेळी स्वतंत्र झाले. पण आज भारत प्रगत राष्ट्र बनला आहे, अमेरिकेचा दबाव झुगारून लावण्याची हिंमत भारताकडे आहे, हेच इम्रान खानच्या भाषणातून पुन्हा एकदा जगासमोर आलं आहे.