बराक ओबामांनी दिली मार्क झुकरबर्गला वॉर्निंग

फेसबुकवर सुरू असलेल्या फेक न्यूज संदर्भात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी खेद व्यक्त केला आहे. फेक न्यूज प्रकरणी ओबामा यांनी झुकरबर्गला वॉर्निंग दिली आहे. अमेरिका राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत डोनाल्ड ट्रंम्प यांच्या विजयाच्यामागे फेक न्यूज आर्टिकल्सचा मोठा हात असल्याचा आरोप फेसबुकवर केला जात आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 25, 2017, 05:25 PM IST
बराक ओबामांनी दिली मार्क झुकरबर्गला वॉर्निंग title=

अमेरिका : फेसबुकवर सुरू असलेल्या फेक न्यूज संदर्भात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी खेद व्यक्त केला आहे. फेक न्यूज प्रकरणी ओबामा यांनी झुकरबर्गला वॉर्निंग दिली आहे. अमेरिका राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत डोनाल्ड ट्रंम्प यांच्या विजयाच्यामागे फेक न्यूज आर्टिकल्सचा मोठा हात असल्याचा आरोप फेसबुकवर केला जात आहे.

जर आपण खरे आणि खोट्यात फरक करु शकलो नाही तर ही खूप गंभीर समस्या असल्याचे ओबामा यांनी यावेळी सांगितले. एका इंग्रजी दैनिकानुसार याआधी १९ सप्टेंबरला पेरू येथे झुकरबर्ग आणि ओबामा यांची भेट झाली होती. या भेटीची चर्चा जगभरात झाली. अशा फेक न्यूजला आळा घालणे कठीण असल्याचे झुकरबर्ग याने सांगितले होते. 
दरम्यान फेक न्यूज ला आळा घालण्यासाठी फेसबुकने १० टीप्स जारी केल्या आहेत. सगळ्यांनी एकत्र येऊन या समस्येशी लढायला हवे असे फेसबुक टीमला वाटत आहे.