सोन्याचं अंड देणारी कोंबडी सापडलीच; अंड्याची किंमत ऐकून म्हणाल बापरे....!

या अंड्याची किंमत ऐकून तुमचे डोळे विस्फारले असतीलच

Updated: Aug 13, 2022, 11:17 AM IST
सोन्याचं अंड देणारी कोंबडी सापडलीच; अंड्याची किंमत ऐकून म्हणाल बापरे....! title=

युके : अंडी ही आपल्या जवळपास दररोज वापरल्या जाणाऱ्या वस्तूंपैकी एक आहे. लोक डाएटसाठी आणि टेस्टी नाश्त्यासाठी अंडी खातात. साधारण: ही अंडी बाजारात 8 ते 12 रुपयांना मिळतात. कडकनाथ कोंबड्यांच्या अंड्यांची किंमत 70 ते 100 रुपयांपर्यंत मिळते. पण तुम्ही कधी एक कोंबडीचं अंडं हजारो रुपयांना विकलं जात असल्याचं ऐकलंय का? तुम्हालाही हे खोटं वाटेल, पण हे सत्य आहे.

50 हजारांचं एक अंड

युनायटेड किंगडममधील हे कुटुंब आपल्या कोंबडीचं एक अंडे 50 हजार रुपयांना विकतंय. ऑनलाइन विकल्या जाणाऱ्या या अंड्याची किंमत भारतीय चलनानुसार £500 म्हणजेच 47 हजार रुपये आहे. हे अंडं 50 हजार रुपयांनाही विकलं जाऊ शकतं.

या अंड्याची किंमत ऐकून तुमचे डोळे विस्फारले असतीलच. आता हे देखील जाणून घेऊया की, या अंड्याची किंमत इतकी असण्यामागे या अंड्यामध्ये काय वैशिष्ट्यं.

खूप दुर्मिळ आहे अंड

गेल्या 20 वर्षांपासून अॅनाबेल मुलकाही यांच्या घरात कोंबड्यांचं पालनपोषण करण्यात येतंय. यातील एका कोंबडीने एका सकाळी अशी अंडी घातली, जी पाहून घरातील सदस्यही आश्चर्यचकित झाली. तिने हे अंडे वेस्ट ऑक्सफर्डशायरमध्ये राहणाऱ्या आपल्या मुलांना दाखवलं आणि त्यांनी त्यात रस दाखवायला सुरुवात केली. 

ट्विन्स्की नावाच्या या कोंबडीने दुर्मिळ अंडी घातली आहे. अॅनाबेलने या अंड्याबद्दल गुगलवर सर्च केलं असता, हे अंडं दुर्मिळ असल्याचं तिला आढळले. त्याच्या आकारामुळे ते दुर्मिळ मानलं जातं. हे इतर अंड्यांसारखं अंडाकृती नसून पूर्णपणे गोलाकार आहे. 

अॅनाबेलने या दुर्मिळ अंड्याबद्दल गुगल सर्च केलं असता समजलं की, असं अंडे कोटीत एक असते. सुरुवातीला अॅनाबेलने या अंड्याची किंमत सुमारे £100 म्हणजेच 10 हजार ठेवली होती. लिलावानंतर त्याची किंमत वाढली आहे. याआधी 2018 मध्ये देखील ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये स्टॉकमन्स एग्ज नावाच्या फार्ममध्ये 3 पट मोठी अंडी सापडली होती. त्याचे वजन 178 ग्रॅम होते, तर अंडी साधारणपणे 58 ग्रॅम असतात.