ईsss... रक्तपिपासू ढेकणांमुळं देश संकटात; मेट्रो, रेल्वे स्थानक, बस आणि घरांमध्ये सुळसुळाट

Bedbug Crisis : सहसा एखादा ढेकूण दिसला की त्याला मारण्यासाठीच अनेकजण सरसावता. कारण, त्या एका ढेकणाचे एक हजार व्हायला वेळ लागत नाही असं आपण ऐकलेलं असतं.   

सायली पाटील | Updated: Oct 4, 2023, 08:08 AM IST
ईsss... रक्तपिपासू ढेकणांमुळं देश संकटात; मेट्रो, रेल्वे स्थानक, बस आणि घरांमध्ये सुळसुळाट  title=
france paris facing major bedbugs problem prior Olympic Games 2024 raises health issues

Bedbug Crisis : ढेकूण... नाव ऐकूनच अनेकांना किळस वाटते. काहींच्या अंगावरच काटा येतो. काहींना तर, जा लहानसा ढेकूण पहावतही नाही. हाच ढेकूण देशासाठी राष्ट्रीय संकट ठरतोय यावर तुमचा विश्वास बसेल का? आश्चर्यचकित होऊ नका, कारण हे खरंय. जगातील एका देशावर या ढेकणांच्या हल्ल्यामुळं एक वेगळंच संकट उभं राहिलं असून आता देशात आरोग्याच्या समस्याही डोकं वर काढताना दिसत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून थेट देशातील सरकारनंही यात लक्ष घातलं आहे. कारण, इथं जळी स्थळी काष्ठी पाषाणी फक्त आणि फक्त ढेकूणच नजरेस पडत आहेत. 

हा किळसवाना प्रकार घडत आहे, फ्रान्समध्ये. फ्रान्समधील बहुतांश भागांत आणि त्यातही पॅरिसमध्ये सध्या ढेकणांनी सर्वांनाच सळो की पळो करून सोडलं आहे. इथं फक्त घरांमध्येच नव्हे, तर सिमेनागृह, रेल्वे, मेट्रो, रेल्वेची आसनं, बस इतकंच काय तर, विमानतळामध्येही ढेकणांचा सुळसुळाट झाला आहे. पॅरिसमध्ये ज्या वेगानं ढेकणांचा फैलाव होत आहे हे पाहता येत्या काळात त्यामुळं पसरणाऱ्या आरोग्याच्या समस्या आणि महामारीही डोकं वर काढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशातील एकंदर चित्र आणि नागरिकांमध्ये असणारी भीती पाहता पॅरिसमधील यंत्रणांनी आपात्कालीन बैठका बोलवल्या असून, ढेकणांचा नायनाट करण्यासाठीचं अभिनयान सुरु केलं आहे. 

तुम्हीही रक्तपिपासू ढेकणांच्या संपर्कात येऊ शकता...

2024 ला फ्रान्समध्ये Olympic Games चं आयोजन केलं जाणा असून, याच देशाकडे ऑलिम्पिक खेळांचं यजमानपद असणार आहे. अशा परिस्थितीत इतक्या मोठ्या आयोजनापूर्वीच देशावर आलेलं हे ढेकणांचं संकट मोठी आव्हानं निर्माण करताना दिसत आहे. किंबहुना परदेशी खेळाडूंना याचा मोठा फटका बसू शकतो अशीही भीती स्थानिक प्रशासन व्यक्त करत असून, आता या संकटावर मात करण्यासाठीच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. 

दरम्यान, इथं ढेकणांविरोधातील मोहिमा राबवण्यात येत असतानाच तिथं पॅरिसचे डेप्युटी मेयर इमॅन्युअल ग्रेगोईरे यांनी कोणीही या संकटापासून सावध नाही असं म्हणत एक पत्रक जारी केलं. जिथं त्यांनी 'तुम्ही सर्वजण ढेकणांच्या विळख्यात येऊ शकता. एकदा का तुम्ही ढेकणांच्या संपर्कात आलात तर ते तुमच्या घरापर्यंत जातील', अशा शब्दांत भीती व्यक्त केली.

हेसुद्धा वाचा : Nobel Prize 2023: कुणीच केला नाही असा प्रयोग करणाऱ्या ऑगस्टीनी, क्राऊसज आणि हुलियर यांना भौतिकशास्त्रातील नोबेल

 

इतक्यावरच न थांबता फ्रान्सच्या सरकारी रेडिओ सेवा ‘फ्रांस इन्फो’ला विनंती करत परिस्थितीचं गांभीर्य पटवून देण्याचा प्रयत्न केला. ढेकणांमुळं फोफावणाऱ्या आजारपणांच्या उपचारांचा समावेश विमा कव्हरमध्ये करण्यात यावा असं म्हणत सध्या स्थानिक ढेकणांपासून पसरणाऱ्या आजारपणावर उपचार करण्यासाठी असमर्थ असल्याची बाब अधोरेखित केली. 

नैराश्यात वाढ... 

ढेकूण रात्रीच्याच वेळी मानवी रक्ताच्या शोधात बाहेर पडतात. ते चावल्यास त्वचेवर खाज येते, अनेकदा लालसर चट्टा तयार होतो. अनेकांची झोप उडते. इतकंच काय तर, ढेकणांमुळं तणाव आणि नैराश्यासारख्या समस्याही सतावतात. त्यामुळं सध्या पॅरिस आणि जवळपास संपूर्ण फ्रान्समधील सार्वजनिक प्रवास यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा या संकटाशी दोन हात करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.