Nobel Prize 2023: कुणीच केला नाही असा प्रयोग करणाऱ्या ऑगस्टीनी, क्राऊसज आणि हुलियर यांना भौतिकशास्त्रातील नोबेल

ऑगस्टीनी, क्राऊसज आणि हुलियर यांनी पदार्थातील इलेक्ट्रॉन गतिशीलतेचा अभ्यास केला आहे. प्रकाशाच्या अ‍ॅटोसेकंद पल्सेस जनरेट करणाऱ्या पद्धतीवर यांनी अतिशय सूक्ष्म संशोधन केले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Oct 3, 2023, 05:37 PM IST
Nobel Prize 2023: कुणीच केला नाही असा प्रयोग करणाऱ्या ऑगस्टीनी, क्राऊसज आणि हुलियर यांना भौतिकशास्त्रातील नोबेल title=

Nobel Prize 2023: जगभरात सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा झाली आहे. भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार पियरे ऑगस्टीनी (Pierre Agostini),  फेरेंक क्राऊसज (Ferenc Krausz) आणि अॅन एल हुईलियर (Anne L’Huillier) यांना जाहीर झाला आहे. इलेक्ट्रॉन्सचा अतिशय सूक्ष्म पातळीवर अभ्यास केल्याबद्दल या तिघांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांच्या या संशोधनामुळे ब्रम्हांडाचा अभ्यास करण्याबरोबरच वैद्यकीय उपचार आणि निदान क्षेत्रात सुद्धा मोठा बदल घडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

इलेक्ट्रॉनचा अतिशय सूक्ष्म अभ्यास

ऑगस्टीनी, क्राऊसज व हुईलियर यांनी असे टूल्स विकसित केले की ज्यातून एटोसेकंद इतक्या वेळात इलेक्ट्रॉनचा अभ्यास करता येणे शक्य झाले. एटोसेकंद सेकंदाचा 1,000,000,000,000,000,000 वा भाग आहे. हुईलियर यांनी केलेल्या प्रयोगानुसार, एखाद्या नोबल गॅसमध्ये इन्फ्रारेड लाइट सोडल्यास प्रकाशाच्या परावर्तित किरण दिसून येतात. प्रत्येक प्रत्येक परावर्तित किरणाची गती वेगळी असते. जेव्हा गॅसच्या एटमला प्रकाश धडकतो तेव्हा एटमच्या इलेक्ट्रॉन्सला इतकी ऊर्जा मिळते ते प्रकाशित होतात. हुईलियर स्वीडनच्या विद्यापीठात भौतिकशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत.

पियरे ऑगस्टीनी यांनी 2001 मध्ये प्रयोग केला. त्यानुसार, त्यांनी प्रकाशाचे कंपन चालवले. प्रत्येक पल्स 250 एटोसेकंदपर्यंत थांबले. त्याचवेळी ऑगस्टीनी यांचे सहकारी क्राऊसज यांनी प्रकाशाचे एक कंपन 650 एटोसेकंदपर्यंत रोखून दाखवले.

या तिन्ही संशोधकांच्या प्रयोगामुळे  इलेक्ट्रॉन्सचे जग इतक्या जवळून पाहायला मिळाले. आतापर्यंत असा प्रयोग कुणीही करू शकलेला नाही. यातून केवळ ब्रह्मांडाचा अभ्यासच नव्हे, तर वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा अमुलाग्र बदल घडवले जातील अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

यातून कित्येक आजारांचे बारकाईने निदान करता येतील. निदान झाल्यास त्यावर उपचारही करता येतील. ब्रह्मांडाच्या निर्मितीचे आकलन करता येईल. सोबतच, इलेक्ट्रॉनिक जगतात अनेक प्रकारचे नव-नवीन प्रयोग करता येतील.

वयाच्या  25 व्या वर्षी मिळवला भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार

1901 पासून ते आतापर्यंत भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी 116 संशोधकांना नोबेल पुरस्कारे सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये चार महिल संशोधकांचा देखील समावेश आहे. 1903 मध्ये मेरी क्युरी, 1963 मध्ये मारिया गॉपर्ट मेयर, 2018 मध्ये डोना स्ट्रिकलँड आणि 2020 मध्ये आंद्रिया गेझ यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार  मिळाले होते. जॉन बार्डीन हे एकमेव शास्त्रज्ञ आहेत ज्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारासाठी  दोनदा सन्मानित करण्यात आले.  1915 मध्ये लॉरेन्स ब्रॅग यांना वयाच्या अवघ्या 25 वर्षी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ब्रॅग यांना त्यांच्या वडिलांसह हा नोबेल देण्यात आला होता. आर्थर अश्किन हे सर्वात वयस्क नोबेल पारितोषिक विजेते होते. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  

कोरोना लस विकसीत करण्यासाठी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार

हंगेरीचे  कॅटलीन कराकी (Katalin Karikó) आणि अमेरिका ड्र्यू वीसमन ( Drew Weissman) या दोन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. यांनी कोरोना लस विकसीत करण्यासाठी mRNA वर संशोधन केले. कॅटलीन कराकी आणि अमेरिका ड्र्यू वीसमन यांनी विकसीत केलेल्या mRNA तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरोनासी लस विकसीत करण्यात आली.