ईsssweeee! मगरीच्या लेगपीसचं सूप तरुणी प्यायली, तुम्ही धाडस कराल का?

Godzilla Ramen Viral Video : काहीतरी वेगळं, हटके, चमचमीत खायचंय. एकदम भारीतलं... असं म्हणणाऱ्यांपैकी तुम्हीही एक असाल तर बघा हा पर्याय कसा वाटतोय.   

सायली पाटील | Updated: Jun 29, 2023, 04:53 PM IST
ईsssweeee! मगरीच्या लेगपीसचं सूप तरुणी प्यायली, तुम्ही धाडस कराल का?  title=
godzilla ramen a restaurant serves horibble dish video went viral

Godzilla Ramen Viral Video : काही मंडळींना एक सवय असते. ती म्हणजे आपण जिथंजिथं फिरस्तीवर जाऊ, तिथंतिथं त्या ठिकाणच्या स्थानिक खाद्यपदार्थांवर ता मारायचा. 'आज कुछ तूफानी करते है...'असं म्हणत ही मंडळी मग वाईटातल्या वाईट पदार्थापासून अगदी विचित्र, विचारही करता येणार नाही, अशा पदार्थाची चव चाखतात. खरतर ही धाडसी वृत्ती सर्वांचीच नसते. काही मंडळी मात्र याला अपवाद ठरतात. 

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओतून दिसणारी एक तरुणी याच धाडसी गटातील मंडळींपैकी एक म्हणावी लागेल. कारण, तिनं जे काही केलंय ते पाहून नेटकरीही हैराण आहेत. काहींनी तर, त्यावर किळसवाण्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. 

नेटिझन्समध्ये सुरु असणाऱ्या चर्चांनुसार हा व्हिडीओ तैवानमधील एका रेस्तराँचा आहे. जिथं एक अतिशय विचित्र खाद्यपदार्थ सर्व्ह केला जातो. 'गॉडझिला रामेन बाऊल' असं त्याचं नाव. आता नावावरूनच तुम्हाला साधारण अंदाज आला असेल की, या डिशमध्ये नेमकं काय असू शकतं. 

हेसुद्धा वाचा : Smallest Handbag : पाण्याच्या थेंबापेक्षाही लहान हँडबॅग; किंमत ऐकून वेड लागेल

 

Nu Wu Mao Kuei नावाच्या या रेस्तराँमध्ये युनलिन काऊंटीमधील डौलियू शहरात हे हॉटेल आहे. हल्लीच तिथं एक जगावेगळा पदार्थ विकला जाऊ लागला आहे, ज्यामध्ये चक्क मगरीचं मांस दिलं जातं. इतकंच नव्हे, तर हा मगरीचा लेगपीसच त्या पदार्थाचा मुख्य भाग आहे. रेस्तराँनं केलेल्या दाव्यानुसार ही मंडळी या नूडल्स बाऊलची चव वाढवण्यासाठी तब्बल 40 मसाल्यांचा वापर करतात. 

कसा तयार होतो पदार्थ? 

आता तुम्हीही विचार कराल, की हे 40 मसाले नेमके कोणते आणि त्यानं इतका काय फरक पडणार? तर, या मसाल्यांबाबत तर सध्या फारशी माहिती नसून, तुम्हाला हे जाणून घ्यायचंच असेल तर थेट त्या हॉटेलला भेट द्या. इथं मगरीचं मांस वाफेवर शिजवलं जातं. बरं, त्या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिलेच्या सांगण्यानुसार त्याची चव अगदी चिकनसारखी दिसतेय तर, मांसाची चव पोर्कसारखीच (डुकराचं मांस) लागतेय. सूत्रांच्या माहितीनुसार या रेस्तराँचा मालक काही काळासाठी थायलंडमध्ये सुट्ट्यांच्या निमित्तानं गेला असता त्यानं तिथं हे नूडल्स सूप बनवणं शिकलं. या विचित्र सूपसाठी सध्या ग्राहक प्रचंड कुतूहल व्यक्त करत असून, काहीजण तर त्यासाठी तब्बल 48 डॉलर्स म्हणजेच साधारण 4 हजार रुपये मोजत आहे.

सूपसाठी लागणारं साहित्य जितकं खास आहे तितकीच त्यासाठी वापरली जाणारी मगर. कारण, हे मगरीचे लेगपीस थेट Taitung वरून मागवले जातात त्यामुळं एका दिवसात फक्त दोन ग्राहकांनाच या पदार्थाची चव चाखता येते. ज्यासाठी आधी ऑनलाईन बुकींग करावी लागते. सूपचं हे प्रकरण ऐकून काहीसं किळसवाणं वाटत असलं तरीही ते काहींसाठी कमाल रंजक ठरतंय. तुम्हीही आता पुढच्याच क्षणाला त्याबद्दल Google Search करणार ना?