अल्लू अर्जूनविरोधात गुन्हा दाखल होणार; अचानक घेतलेला 'तो' निर्णय ठरला कारणीभूत; पोलीस म्हणाले 'माहिती असूनही...'

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनविरोधात (Allu Arjun) हैदराबाद पोलीस (Hyderabad Police) गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत. चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान झालेली चेंगराचेंगरी आणि त्यात एका महिलेचा झालेला मृत्यू यासाठी गुन्हा दाखल केला जाणार आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 5, 2024, 07:19 PM IST
अल्लू अर्जूनविरोधात गुन्हा दाखल होणार; अचानक घेतलेला 'तो' निर्णय ठरला कारणीभूत; पोलीस म्हणाले 'माहिती असूनही...'

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनविरोधात (Allu Arjun) हैदराबाद पोलीस (Hyderabad Police) गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत. अल्लू अर्जुन त्याच्या "पुष्पा 2: द रुल" या चित्रपटाच्या प्रीमियर शोसाठी कोणतीही पूर्वसूचना न देता आला होता. यानंतर हैदराबादमधील थिएटरबाहेर झालेली चेंगराचेंगरी आणि एका महिलेचा मृत्यू यानिमित्ताने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

अल्लू अर्जूनसह संध्या चित्रपटाच्या व्यवस्थापनाविरोधातही गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे. गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी सुरक्षेबाबत अतिरिक्त तरतुदी न करण्यात आल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे. याप्रकरणी अल्लू अर्जून किंवा चित्रपटगृह मालकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

एका निवेदनात हैदराबादचे पोलीस आयुक्त सीव्ही आनंद म्हणाले की, "चित्रपटगृह व्यवस्थापन किंवा कलाकारांच्या टीमकडून ते थिएटरला भेट देणार असल्याची कोणतीही सूचना नव्हती. चित्रपटगृह व्यवस्थापनाला त्यांच्या आगमनाची माहिती असतानाही अभिनेता आणि त्याच्या टीमसाठी प्रवेश कऱण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली नव्हती".

पोलिसांनी सांगितले की, मोठा जमाव पुढे आल्याने थिएटरचे मुख्य गेट कोसळले. ज्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. सुव्यवस्था राखण्याचे प्रयत्न करूनही चेंगराचेंगरी जीवघेणी ठरली. रेवती असं मृत महिलेचं नाव असून तिच्या मुलाचं नाव तेजा असे आहे. तेजाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू असल्याचं समजत आहे. 

पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहितेच्या विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "थिएटरच्या आत गोंधळलेल्या परिस्थिती निर्माण होण्यासाठी आणि त्यामुळे मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल  जबाबदार असलेल्या सर्व व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल," असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More