वॉशिंग्टन : अमेरिकेतल्या एका गोरिला माकडानं जगाचा निरोप घेतलाय. अतिशय हुशार माकड अशी त्याची ओळख होती. कोकोचं जाणं एवढं चटका लावणारं का ठरलंय ?
कोको.... गोरीला माकडीण.... एक अतिशय हुशार माकड म्हणून तिची जगभरात ओळख होती. कोको सांकेतिक खुणांच्या भाषेतून संवाद साधायची. तिला एक हजारांपेक्षा जास्त खुणा येत होत्या. त्या माध्यमातून ती माणसांशी बोलायची. डॉक्टर फ्रॅक्सिन पॅटरसननं १९७४ साली कोकोला खुणांची भाषा शिकवायला सुरुवात केली. अमेरिकेतल्या सॅन फ्रॅन्सिस्कोमधल्या एका प्राणीसंग्रहालयात कोकोचा जन्म झाला होता. कोकोनं एक वर्षांची झाल्यापासूनच खुणांची भाषा शिकायला सुरुवात केली. तिची प्रशिक्षक डॉक्टर फ्रॅक्सिन पॅटरसन आणि कोको या जन्मभराच्या मैत्रिणी होत्या. कोकोनं एक मांजरही दत्तक घेतलं होतं. कोकोनंच त्या मांजराचं नाव ऑल बॉल असं ठेवलं होतं. कोको आणि ऑल बॉल यांचं नातं अक्षरशः मायलेकींचं होतं. त्या मांजराचा आणि कोकोचा फोटो नॅशनल जिओग्राफिकनं छापल्यावर कोको जगप्रसिद्ध झाली होती. प्रसिद्ध अभिनेता रॉबिन विल्यम्सनंही कोकोची भेट घेतली होती. त्यावेळी कोकोनं खुणांच्या माध्यमातून रॉबिनशीही संवाद साधला होता. ही भेट फारच संस्मरणीय ठरल्याची प्रतिक्रिया त्यावेळी रॉबिन विल्यम्सनं दिली होती.
हजारांपेक्षा जास्त खुणांनी संवाद साधणाऱ्या कोको गोरीला माकडीणीची अनेक संस्थांनी कौतुक केलं होतं. तिच्यावर अनेक माहितीपटही तयार झालेत. याच कोकोनं कॅलिफोर्नियामधल्या सांताक्रूझ पर्वतावर कोकोनं अखेरचा श्वास घेतला. आणि वयाच्या ४६ व्या वर्षी झोपेतच तिचं निधन झालं. कोको तुला जग नक्की मिस करेल.