हाफिजला पकडण्यासाठी दोन वर्षे पाकिस्तानवर दबाव टाकला- ट्रम्प

हाफिजला दहशतवाद विरोधी पथकाने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून बुधवारी अटक केली.

Updated: Jul 18, 2019, 08:50 AM IST
हाफिजला पकडण्यासाठी दोन वर्षे पाकिस्तानवर दबाव टाकला- ट्रम्प  title=

वॉशिग्टंन : मुंबईवरील २६\११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उल-दवा या दहशतवादी संघटनेचा नेता हाफिज सईद याला अटक करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या अटकेचे स्वागत केले आहे. दहा वर्षांच्या शोधानंतर मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाईंला पाकिस्तानमध्ये पकडण्यात आले. त्याच्या शोधासाठी आम्ही दोन वर्षे दबाव आणला, असे ट्वीट ट्रम्प यांनी केले आहे. हाफिजला दहशतवाद विरोधी पथकाने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून बुधवारी अटक केली. पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांच्या अमेरिका दौऱ्याच्या काही दिवस आधी ही कारवाई करण्यात आली आहे. 

निर्णयाला आव्हान  

काही दिवसांपूर्वी हाफिज सईद आणि इतर काही दहशतवाद्यांनी त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या खटल्याला लाहोर उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार सईदसह ज्यांनी आर्थिक मदत पुरवण्यासंबंधीच्या खटल्याला आव्हान केलं होतं, त्यामध्ये अब्दुर रहमान मक्की, आमिर हमजा, एम. यहया अजीज आणि चार इतर दहशतवाद्यांचाही समावेश आहे. 

दहशतवादी कारवायांसाठी पाच संस्थांच्या माध्यामातून, आर्थिक पाठबळ देत असल्यासंबंधीचे २३ खटले सईद आणि त्याच्या इतर १२ सहकाऱ्यांविरोधात दाखल करण्यात आले होते.