मुंबई : तुम्ही अनेकदा लोकांना पृथ्वीच्या बाहेर दुसरं जग असल्याबद्दल बोलताना ऐकलं असेल. पण त्याचे वास्तव काय आहे हे कोणालाच माहीत नाही. जमिनीनंतर, पाताळात आणखी एक जग असल्याबद्दलही गोष्टी सांगितल्या जातात. असेच काही पुरावे समुद्राच्या खोलात सापडल्यावर अशा रहस्यांबद्दल जाणून घेण्याची लोकांची इच्छा वाढते. ज्याने सर्वसामान्यांनाच नव्हे तर वैज्ञानिकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
असाच एक शोध काही काळापूर्वी लागला होता. जेव्हा पुरातत्वशास्त्रज्ञांनी समुद्राच्या खोलीत पिवळ्या विटांनी बनवलेला रस्ता पाहिला. या रस्त्याबाबत अनेक प्रकारचे दावे केले जाऊ लागले. कुणी म्हटलं की, दुसऱ्या जगात जाण्याचा हा मार्ग आहे, तर कुणी अजून काही वेगळं सांगितलं.
वास्तविक, संशोधकांना समुद्राच्या खोलीत दगडांचा एक विचित्र बनावट दिसून आली. पिवळ्या रंगाच्या विटांनी बनवलेली एक जागा दिसून आली. त्यानंतर त्याचे काही फोटो सोशल मीडियावर आले आणि लोक याला दुसऱ्या जगात जाण्याचा मार्ग म्हणू लागले.
समुद्राच्या खोलीत सापडलेल्या पिवळ्या विटांनी बनवलेल्या या रस्त्याने शास्त्रज्ञांनाही आश्चर्यचकित केलं आहे. एक्सप्लोरेशन वेसल नॉटिलसच्या संशोधकांनी हा रस्ता शोधला आहे. संशोधकांनी त्याला हजारो वर्षांपूर्वी पॅसिफिक महासागरात बुडालेलं बेट म्हटलं आहे. समुद्रात सापडलेला हा पिवळ्या रंगाचा रस्ता पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलंय.
समुद्रातील हा रहस्यमय रस्ता पाहून संशोधकांनाही आश्चर्य वाटलंय. मात्र, नंतर संशोधकांनी गमतीने सांगितले की, हा दुसऱ्या जगात जाण्याचा मार्ग आहे. शास्त्रज्ञांनी शोध मोहिमेदरम्यान हा रस्ता शोधला आहे.
संशोधकांना समुद्रात सापडलेल्या रस्त्यांपैकी केवळ तीन टक्के रस्ता शोधण्यात यश आलं आहे. रेक्टँग्युलर ब्लॉक्समधून हा रस्ता तयार करण्यात आल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हे काल्पनिक बेट ग्रीक दंतकथेशी संबंधित आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा रस्ता नसून कोरडा तलाव आहे.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचे समर्थन करत नाही.)