हिंदू - मुस्लिम यांचा असा अनोखा भाईचारा की तुम्हीही म्हणाल 'हम साथ साथ है'

प्रोफेसर प्रणवकुमार धोपे आणि अवामी लीगचे शेख मजहूर रहमान या दोघांनी त्यांच्या प्रयत्नामुळे एक नवा आदर्श समोर आणला आहे.

Updated: May 1, 2022, 05:43 PM IST
हिंदू - मुस्लिम यांचा असा अनोखा भाईचारा की तुम्हीही म्हणाल 'हम साथ साथ है' title=

ढाका : बांगला देशातील बाघेरहाट जिल्ह्यातील फकिरहाट येथील ही बातमी आहे. एका कॉलेजचे प्रोफेसर आणि एक मुस्लिम नेते यांनी आपली जात - धर्म विसरून एकमेकांच्या धर्मासाठी जे केलंय ते पाहून तुम्हीही म्हणाल 'हम साथ साथ है'

अजहर अली डिग्री कॉलेजचे प्रोफेसर प्रणवकुमार धोपे आणि अवामी लीगचे स्थानिक नेते शेख मजहूर रहमान या दोघांनी पुढाकार घेतला. या दोघांनी मिळून शहरात मुस्लिमांना नमाज पढण्यासाठी आणि हिंदुना विधिपूर्वक अंत्यसंस्कार करता यावे यासाठी आधुनिक सुविधांसह स्मशानभूमी बांधण्यासाठी वर्गणी गोळा करण्यास सुरवात केली. 

त्यांच्या या प्रयत्नांना बऱ्यापैकी यशही मिळाले. पण, यातही एक अडचण निर्माण झाली ती जागेची. या दोघांना आपल्या धर्म बांधवांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा हवी होती. यावर त्यांनी एक उपाय काढला.

आसपास कोठेही मशीद नाही म्हणून मुस्लिमांच्या सुविधेसाठी या भागात मशीद बांधण्यासाठी प्रोफेसर प्रणवकुमार धोपे यांनी आपली जमीन दान केली. तर हिंदूंना त्यांच्या नातेवाइकांचे हिंदू धर्माच्या विधीनुसार अंत्यसंस्कार करता यावे म्हणून शेख मजहूर रहमान यांनी स्मशानभूमी बांधण्यासाठी मदत केली.

प्रोफेसर प्रणवकुमार धोपे आणि अवामी लीगचे शेख मजहूर रहमान या दोघांनी त्यांच्या प्रयत्नामुळे एक नवा आदर्श समोर आणला आहे. हा हिंदू मुस्लिम सलोखा केवळ बांगला देशासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी आदर्श विचार ठरला आहे.