IBN Layoff: सध्या सगळीकडेच नोकरकपातीचा ट्रेण्ड आला आहे. त्यातून सध्या सगळ्या कर्मचाऱ्यांवरच टांगती तलवार आहे. जगातील मोठमोठ्या कंपन्यांकडून नोकरकपातीचा ट्रेण्ड सुरू झाला आहे त्यामुळे अख्ख्या जगात सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातून आता पुन्हा एकदा एका मोठ्या कंपनीनं मोठ्या प्रमाणात नोकरकपात केली आहे. ही कंपनीही मोठी असून सध्या या कंपनीनं नोकरपात केली आहे आणि हजारो लोकांना कामावरून काढून टाकले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण सगळीकडेच पसरले आहे. याआधीच मायक्रोसॉफ्ट (Microsoft), ट्विटरसारख्या (Twitter) कंपनीनं मोठी कपात केली होती. याआधीही मोठ्या आणि लहान कंपनीनं नोकरकपात केली आहे. सध्या ही नोकरकपात मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. (ibn lays off 3 thousand and 900 employees)
रॉयटर्सनं याबद्दलची माहिती स्पष्ट केली आहे. या कंपनीचं नावं आहे आयबीएम (IBM). आयबीएम या कंपनीनं नुकत्याच 3 हजार 900 लोकांना नारळ दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा कंपन्यांवर सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त होताना दिसते आहे. बुधवारी आयबीएमनं या नोकरकपातीचा निर्णय घेतला. या कंपनीनं हा निर्णय कंपनीच्या वार्षिक रोखीचं लक्ष्य गाठण्यात अयशस्वी ठरल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी जेम्स कॅव्हानो यांनी दिली आहे.
आर्थिक मंदीचा मोठा फटका या कंपन्यांना बसलेला दिसतो आहे त्याचबरोबर अनेक कंपन्यांनी याबाबत गंभीर निर्णयही घेतले आहेत. कंपन्या या अनेकदा स्ट्रेजिक एरियामध्ये नोकरभरती करताना दिसतात. त्याचबरोबर काही बॅंकएन्डच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यातून मायक्रोसॉफ्ट, गुगल, अॅमेझॉन, स्विगी शेअर चॅट यासांरख्या कंपन्यांनी कामावरून काढून टाकण्यात आले आहे. कोस्ट कटींगसाठी अनेक कंपन्या ही नोकरकपात करणार आहेत. मोठ्या अमेरिकन कंपन्यांना नोकरकपातीचा (Global Layoff) मोठा फटका बसला आहे.
मायक्रोसॉफ्टनं जवळपास 10,000 कर्मचार्यांची कपात केली आहे. त्याचसोबतच amazon नं 18,000 कर्मचारी कपात केली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना अचानक काढून टाकण्यात आल्यामुळे सोशल मीडियावर किंवा लिंकडिनसारख्या पोस्टवरून अनेकांच्या स्टोरीजही व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे सगळ्यांनी आपल्याला स्टोरीज या पोस्ट केल्या होत्या. त्यात अनेकांनी आपल्या इमोशनल स्टोरीजही शेअर केल्या होत्या. त्यामुळे सध्या हे व्हिडीओज सगळीकडेच व्हायरल झाले होते.
काहींनी 5 टक्के कंपनीची नोकरकपात केली आहे तर काहींना 17-18 टक्के नोकरकपात केली आहे. आता एवढ्या मोठ्या नोकर कपातीनंतर पुन्हा एकदा हायरिंग कधी होणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.