बगदाद : इराकच्या न्यायालयाने दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (आयएस)शी संबंध असणाऱ्या सुमारे ३००हून अदिक लोकांना मृत्यूदंड दिला आहे. ही शिक्षा मिळालेल्यांमध्ये अनेक विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयीन सूत्रांनी बुधवारी दिलेल्या माहितीनसार, या प्रकरणातील खटले अद्यापही सुरू असून आणखी काही संशयीतांवर उत्तर इराकच्या मोसुल आणि बगदाद येथील न्यायालयात खटला चालवला जाणार आहे.
दरम्यान, न्यायालयीन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानीमध्ये जानेवारीपासून ते आतापर्यंत ९७ नागरिकांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर, १८५ लोकांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. शिक्षा सुनावलेल्या महिलांपैकी अधिक महिला या तुर्की आणि पूर्व सोव्हियत संघातील राज्यांमधील आहेत.
सूप्रीम ज्यूडीसियल काऊन्सीलचे प्रवक्ते उब्देल सत्ता यांनी एका प्रतिक्रियेत सांगितले की, मोसुजवळ तेल कीफच्या एका न्यायालयाने २१२ लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. इराकने आयएसविरूद्ध डिसेंबरमध्ये विजयाची घोषणा केली होती. एक काळ असा होता की, अत्यंत जहाल दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी देशाच्या एक तृतियांश जागेवर तबा मिळवला होता. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात येत आहे.