Japan Earthquake: टोकियो भूकंपाने हादरलं, 6.1 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद

पानमध्ये भूकंपाचे झटके बसल्याने नागरिक घर सोडून बाहेर पडले.

Updated: Oct 7, 2021, 08:27 PM IST
Japan Earthquake: टोकियो भूकंपाने हादरलं, 6.1 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद title=

टोकियो : जपानमध्ये एका वेगवान भूकंपाने सर्वांना हादरवून सोडले. यानंतर नागरिक घर सोडून बाहेर पडले. जपानच्या हवामानशास्त्र संस्थेने सांगितले की, 6.1 तीव्रतेच्या भूकंपामुळे टोकियो हादरला. जपानमध्ये आलेल्या या भूकंपामुळे अजून तरी नुकसानीची कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. यापूर्वी 4 ऑगस्ट 2021 रोजी टोकियोच्या किनारपट्टीवर भूकंपाचे धक्के जाणवले होते. तेव्हा भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6 इतकी मोजण्यात आली.

जपानमध्ये वेळोवेळी भूकंप होतात आणि म्हणून इमारती आणि घरे देखील त्यानुसार डिझाइन केली जातात जेणेकरून जास्त नुकसान होणार नाही.

11 मार्च 2011 रोजी जपानमध्ये 9 रिश्टर स्केलचा भूकंपाची नोंद झाली होती. यामुळे जपानमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश झाला. भूकंपामुळे निर्माण झालेल्या त्सुनामीने ईशान्य होन्शुच्या तोहोकू प्रदेशाला पूर्णपणे उध्वस्त केले. भूकंप आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमुळे 18,000 हून अधिक लोक मारले गेले आणि सुमारे 50 लाख लोकं विस्थापित झाले. या दुर्घटनेला 10 वर्षे झाली आहेत.