World's Richest Persons List News In Marathi : जगातील श्रीमंतांच्या यादीत सर्वात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. बराच काळ टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादी पहिल्या स्थानावर होते. मात्र सोमवारी (4 मार्च 2024) त्यांना मोठा धक्का बसला. सोमवारी मस्कच्या एकूण संपत्तीत $17.6 अब्जची घट झाली असून ते दुसऱ्या स्थानावर घसरले आहे. तर श्रीमतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस विराजमान झाले आहेत. ब्लूमबर्ग निर्देशांकानुसार, बेझोस 200 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. तर मस्क 188 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर घसरले. गेल्या 9 महिन्यांत पहिल्यांदाच मस्क श्रीमंतांच्या यादीत मागे पडले आहेत.
जेफ बेझोस यांनी एलॉन मस्क यांना मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती ठरले आहे. तर एलॉन मस्कची यांची संपत्ती 197.7 अब्ज डॉलर्स असून बेझोची यांची एकूण संपत्ती 200.3 अब्ज डॉलर्स आहे. 2021 नंतर, बेझोस प्रथमच श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. हे पंतप्रधान म्हणून ओळखले जाणारे पहिले व्यक्ती आहेत. दरम्यान जागतिक बाजारात एलॉन मस्कची कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे आणि त्यामुळे एलॉन मस्कचीच्या एकूण संपत्तीत 17.6 अब्ज डॉलरची घट झाली आहे. टेस्ला कंपनीच्या एकूण भांडवलात घट झाल्यामुळे, एलॉन मस्कचीची एकूण संपत्ती 200 अब्ज डॉलर्सने रिकामी झाली. सध्या, $198 अब्ज संपत्तीसह, एलोन मस्क ब्लूमबर्ग निर्देशांकात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
अर्नॉल्ट सध्या 197 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती $18.3 अब्जने वाढली आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्सचे सीईओ मार्क झुकेरबर्ग 179 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या स्थानावर आहेत. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती सर्वाधिक $५०.७ अब्जने वाढली आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स या यादीत 150 अब्ज डॉलर्ससह पाचव्या स्थानावर आहेत. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती $8.88 अब्जने वाढली आहे.
भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी 115 अब्ज डॉलर्ससह या यादीत 11 व्या क्रमांकावर आहेत. सोमवारी त्यांची एकूण संपत्ती $1.24 अब्जने वाढली. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती $18.2 अब्जने वाढली आहे. अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी अंबानींपेक्षा एक स्थान खाली म्हणजे 12 व्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती $104 अब्ज आहे. त्यांची एकूण संपत्ती यावर्षी 19.2 अब्ज डॉलरने वाढली आहे.