जगासमोर सगळं सत्य उघड करू, पाकची अमेरिकेला धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानाला चांगलाच झटका बसलाय. आम्ही जगासमोर सगळं सत्य उघड करू, अशी धमकीच आता पाकिस्तानानं अमेरिकेला दिलीय. 

Updated: Jan 2, 2018, 08:47 AM IST
जगासमोर सगळं सत्य उघड करू, पाकची अमेरिकेला धमकी  title=

इस्लामाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानाला चांगलाच झटका बसलाय. आम्ही जगासमोर सगळं सत्य उघड करू, अशी धमकीच आता पाकिस्तानानं अमेरिकेला दिलीय. 

पाकिस्तानचे परदेश मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफनं ट्विटरवर सोमवारी प्रतिक्रिया दिलीय. 'इंशाअल्लाह आम्ही अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या ट्विटवर लवकरच उत्तर देऊ... आम्ही जगासमोर सत्य उघड करू... तथ्य आणि रचलेल्या कहाण्यांमध्ये काय अंतर असतं, ते आम्ही सांगू' अशा शब्दांत ख्वाजा मोहम्मद यांनी आपला रोष व्यक्त केलाय.

Khawaja Muhammad Asif, Donald Trump, Pakistan, United States
ख्वाजा असिफ यांचं ट्विट 

 

गेल्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेनं पाकिस्तानद्वारे मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याच्या सुटकेची निंदा केली होती. सईदला ताबडतोब अटक करून त्याच्याविरुद्ध खटला चालवण्याची मागणी अमेरिकेनं केली होती. जमात उद दावा प्रमुख सईदविरुद्ध ठोस कारवाई करण्यात पाकिस्तान असक्षम ठरला तर त्याचा परिणाम द्विपक्षीय संबंधांवर होईल, असा इशाराही अमेरिकेनं दिला होता. 

यापूर्वी, अमेरिकेने गेल्या पंधरावर्षांपासून पाकिस्तानला तीन हजार तीनशे कोटी डॉलर्सची केलेली मदत म्हणजे मुर्खपणाच असल्याची कबुली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. या मदतीच्या बदल्यात पाकिस्तानने अमेरिकेच्या नेत्यांना मुर्खात काढत केवळ खोटारडेपणा आणि फसवणूकच केल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केलाय. मात्र, यापुढे हे चालणार नसल्याचा सज्जड इशाराही ट्रम्प यांनी दिलाय.