Kim Jong Un Russia Visit: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन रशिया दौऱ्यावर आहे. मंगळवारी सकाळीच ते रशियात पोहोचले आहे. व्लादिविस्ताकी शहरात किम जोंग आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत भेट घेणार आहेत. तब्बल दीड वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते. किम जोंगच्या दौऱ्यावरुन पुन्हा एकदा त्याचे खासगी आयुष्य चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे किम जोंग विमानाने नव्हे तर एका आलिशान ट्रेनने रशियाला पोहोचले आहेत. इतकंच नव्हे तर, जगात कुठेही फिरायला गेले तरी ते कायम त्यांची टॉयलेट सीट घेऊन फिरतात, या मागंच कारणही समोर आले आहे.
किम जोंग यांच्या खासगी आयुष्याबाबत फार कमी चर्चा होत असते. त्यातीलच एक म्हणजे किम जोंग हे कधीच विमानप्रवास करत नाहीत. कारण किम जोंग यांना विमानप्रवासाची भीती वाटते म्हणूनच ते रेल्वेने प्रवास करतात. त्याचे वडिल आणि आजोबाही रेल्वेनेच प्रवास करायचे. किम जोंग यांच्याकडे एक शाही ट्रेन आहे. त्यातूनच ते नेहमी प्रवास करतात. या ट्रेनमध्ये शाही सुविधा असून त्याची प्रत्येक बोगी बुलेटप्रुफ आहे. आजही रशिया दौऱ्यावर ते ट्रेननेच गेले आहेत. इतकंच, नव्हे तर त्यांच्याबाबत आणखी एक विचित्र चर्चा रंगली आहे ती म्हणजे किम जोंग जिथे जातो तिथे स्वतःची टॉयलेट सीट घेऊन जातो म्हणजेच पोर्टेबल सीट. त्याचे कारणही समोर आले आहे.
उत्तर कोरिया गार्ड कमांडच्या माजी अधिकाऱ्याने वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यामागचे कारण स्पष्ट केले आहे. किम जोंग उन परदेश दौऱ्यावर असताना किंवा बाहेरगावी असताना पोर्टेबल टॉयलेटचा वापर करातात. यामागचे कारण स्पष्ट करताना ते म्हणाले की, दुसऱ्या व्यक्तींना त्यांच्या आरोग्यासंबंधीत समस्या कळू नयेत. पब्लिक टॉयलेट वापरल्यास आरोग्यासंबंधीत माहिती लीक होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणूनच ते पोर्टेबल टॉयलेट वापरतात.
किम जोंग उनसोबत नेहमी एक पोर्टेबल टॉयलेट असते. व्यक्तीच्या विष्ठेचे परिक्षण केल्यास त्याच्या आरोग्यासंबधीत महत्त्वाची माहिती गोळा केली जाऊ शकते. अशावेळी किम जोंग जर दुसरे टॉयलेट वापरत असेल तर त्याच्या शत्रूकडून त्याच्याविरोधात काही तरी केले जाऊ शकते. ही भीती त्यांना सतावत असते. शत्रू्च्या भीतीपोटी ते नेहमी पोर्टेबल टॉयलेटचा वापर करतात. काही वर्षांपूर्वी सिंगापूर दौऱ्यावर असतानाही किम जोंगने पोर्टेबल टॉयलेट नेले होते.