Kuwait Royal Family emir death : कुवेतचे शासक अमीर शेख नवाफ अल अहमद अल सबा यांचे निधन (Nawaf Al Ahmad Al Sabah dies) झाल्याची माहिती समोर आली आहे. कुवेतच्या सरकारी मीडियाने याची शनिवारी अधिकृत माहिती दिली. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आता कुवेतमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
शेख नवाफ हे त्यांच्या मुत्सद्देगिरीसाठी आणि प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ओळखतात. शेख नवाफ यांना त्यांचा सावत्र भाऊ शेख सबाह अल-अहमद अल-सबाह यांनी 2006 मध्ये युवराज म्हणून नियुक्त केले होते. यानंतर, 2020 मध्ये शेख सबाह अल अहमद अल सबाह यांच्या निधनानंतर, त्यांनी अमीर म्हणून शपथ घेतली होती.
حكم الكويت لفتره قصيره .. لكن اثره الطيب الذي غرزه في قلوب أبناء شعبه سيبقى معهم مدى الحياة ..
..#الشيخ_نواف_الاحمد_الصباح .. pic.twitter.com/QjvTQGyXXS
— ASK KUWAIT (@AskAboutKwt) December 16, 2023
भारत आणि कुवेत पारंपारिकपणे मैत्रीपूर्ण संबंध ठेवतात. १९६१ पर्यंत भारतीय रुपया कुवेतचा कायदेशीर टेंडर होता. कुवेतमध्ये अनेक भारतीय नागरिक राहतात. हायड्रोकार्बन आणि इतर क्षेत्रात आमची मोठी भागीदारी आहे. दोन्ही देशात राजकीय, सांस्कृतिक आणि व्यावसायिक स्तरावर मजबूत संबंध आहेत. कुवेतची लोकसंख्या ४८ लाख असून त्यापैकी १० लाख भारतीय आहेत, त्यामुळे दोन्ही देशातील संबंध अधिक मजबूत होत आहेत.