Expensive Christmas Gift: ख्रिसमसचा आठवडा सुरु होतोय. अनेक प्रियकर-प्रेयसी, नवरा-बायको आपल्या जोडीदाराला खास गिफ्ट देतात. जोडप्यांमध्ये सरप्राईज देण्याचे प्रकार अनेकदा फसल्याचे आपण ऐकले असेल.आपल्या जोडीदाराला थेट गिफ्ट देण्याऐवजी सरप्राईज गिफ्ट द्यावे, ज्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित होईल, असे जोडीदाराला वाटते. पण कधी कधी ही कधीकधी यामुळेच खूप मोठा पचका होतो. ख्रिसमसच्या आधी एका जोडप्यासोबत असाच प्रकार घडला होता.
कॅसी नावाच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसोबत हा किस्सा घडला. तू मला सरप्राईज गिफ्ट देत नाही, अशी तक्रार कॅसी वारंवार करत असे. त्यामुळे ख्रिसमसचे निमित्त शोधून नवऱ्याने सरप्राईज गिफ्ट देण्याचे ठरवले. पण पुढे जे घडले ते मजेशीर होते. कॅसीने एक फोटो शेअर केला आहे. हे माझे सरप्राइज गिफ्ट होते का? असा प्रश्न तिने सोशल मीडियावरील फॉलोअर्सना विचारला. यासोबत जळालेल्या लाउंजचे फोटो अपलोड केले. नवर्याने जळालेले कापड विकत घेऊन दिले होते असे नाही, असे ती सांगते.
कॅसीच्या पतीने आपल्या पत्नीला आश्चर्यचकित करण्यासाठी ओव्हनमध्ये गिफ्ट लपवले होते. जेव्हा पत्नीने काहीतरी गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह चालू केला तेव्हा भेटवस्तूला आग लागली. तिच्या पतीने तिच्यासाठी आणलेला महागडा ड्रेस जळून खाक झाला. ओव्हनमधून धूर निघाला तेव्हा प्रकार समोर आला. काहीतरी जळल्याचे कॅसीच्या लक्षात आले पण ते आपल्यासाठी आणलेले महागडे गिफ्ट असेल, याची तिला जाणिवर नव्हती.
या घटनेबाबत सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोकांची उत्तरे खरोखर मजेदार आहेत. काही युजर्सने सांगितले की, नवऱ्याला सरप्राईज द्यायचे होते पण सरप्राईज त्याच्यासोबतच घडले. काहींनी सांगितले की ओव्हन ही भेटवस्तू लपवण्याची जागा आहे. एका यूजरने लिहिले की, आता ही व्यक्ती चुकूनही सरप्राईज देण्याचा विचार करणार नाही.